रसायन आणि खते मंत्रालय

वित्तीय वर्ष 2019-20 आणि 2020-21 साठी राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सकडून 167.16 कोटी रुपयांचा लाभांश केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाला प्राप्त

Posted On: 17 FEB 2021 5:38PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रसायन आणि खतमंत्री श्री.डी.व्ही.सदानंद गौडा यांनी आज, आरसीएफ म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्सकडून प्राप्त झालेला वित्तीय वर्ष 2019-20 साठी 117.51 कोटी रुपये रकमेचा आजवरचा सर्वाधिक लाभांश स्वीकारला. त्याचबरोबर आरसीएफने वित्तीय वर्ष 2020-21 साठी 49.65 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांशही त्यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रतिकूल परिस्थितीतही कंपनीने निव्वळ नफ्यात 235.65% इतकी वाढ करून दाखविली आहे, ही स्तुत्य बाब आहे. चालू वित्तीय वर्षात (डिसेम्बर 2020 पर्यंत) निव्वळ नफा 221.09 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच काळात तो 65.87 कोटी रुपये इतका होता.

 

वित्तीय वर्ष 2019-20 मधील कामगिरीतील ठळक मुद्दे असे-:

  1. आजवरचा सर्वाधिक म्हणजे 9697.95 कोटी रुपये इतका वार्षिक महसूल.
  2. आजवरचे सर्वाधिक म्हणजे इक्विटी समभागांच्या 28.4% इतका लाभांश आरसीएफने वित्तीय वर्ष 2019-20 साठी जाहीर केला, ज्याची रक्कम 156.68 कोटी रुपये इतकी होती. (सरकारचा वाटा- 75%  म्हणजे 117.51 कोटी रुपये)
  3. आरसीएफचे प्रमुख उत्पादन असणाऱ्या एनपीके खत- सुफला- याचा आजवरचा सर्वाधिक खप
  4. सरकारी खात्यावरून युरियाची आयात करण्यासाठी आरसीएफला 'सरकारी व्यापार एकक' म्हणून परवानगी मिळाली.

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698750) Visitor Counter : 125