संरक्षण मंत्रालय

सीमा भागातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात सीमा रस्ते संघटनेला अधिक निधी

Posted On: 17 FEB 2021 4:54PM by PIB Mumbai

 

देशाच्या सीमा भागातल्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटनेला वाढीव निधी देण्याचा प्रस्ताव 2021-22 च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी सीमाभागातील रस्ते विकास प्रकल्पांसाठीचा निधी 5,586.23 कोटी रुपयांवरुन 6,004.08 पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर रस्त्यांच्या देखभालीसाठीची आर्थिक तरतूदही 750 कोटी रुपयांवरुन 850 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. भांडवली खर्चाची तरतूद या आर्थिक वर्षासाठी 2,300 कोटी रुपयांवरुन 2,500  कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे

या वाढीव तरतुदीमुळे,बांधकामासाठी आधुनिक साहित्य, उपकरणे आणि मशिनरीची खरेदी करता येणे शक्य आहे, जेणेकरुण अत्यंत महत्वाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांचा वेग वाढवता येऊ शकेल. तसेच या निधीपैकी मोठा हिस्सा, सीमाभागातील अतिमहत्वाच्या आणि संवेदनशील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी वापरला जाईल तसेच उत्तर आणि ईशान्य भारतात महत्वाचे रस्ते, बोगदे आणि पुलांच्या बांधकामासाठी देखील या निधीचा उपयोग होईल.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698713) Visitor Counter : 88