राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसीडेंट्स इस्टेटमधील राष्ट्रपती भवन क्रीडा स्थळाचे उद्‌घाटन

Posted On: 16 FEB 2021 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज प्रेसीडेंट्स इस्टेटमधील राष्ट्रपती भवन क्रीडा स्थळाचे( नूतनीकरण केलेले फूटबॉलचे मैदान व बास्केटबॉल कोर्ट) उद्‌घाटन केले. यावेळी या ठिकाणी एक प्रदर्शनीय फूटबॉल सामना खेळवण्यात आला. नवी दिल्लीत विकासपुरी येथे वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या माय एन्जल्स या संस्थेमधील बालकांचे संघ या सामन्यात सहभागी झाले.

राष्ट्रपती भवनमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने या अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रेसिडेंट्स सेक्रेटरिएट हिरोज, हाऊसहोल्ड यंग्ज, पीबीजी वॉरियर्स, आर्मी गार्ड डेअरडेव्हिल्स आणि दिल्ली पोलिस स्टाल्वर्ट्स पाच संघांची आजपासून आंतरविभागीय फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698459) Visitor Counter : 202