आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात सक्रीय रुग्ण संख्येतली घट जारी


रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 97.32%, जगातल्या सर्वोच्च दरापैकी एक

गेल्या 24 तासात 17 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात एकही मृत्यू नाही तर 6 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात नवा रुग्ण नाही

87 लाखाहून जास्त लाभार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण

Posted On: 16 FEB 2021 1:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021

 

देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. भारतातली आजची सक्रीय रुग्ण संख्या 1.36 लाख (1,36,872) आहे.

सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 1.25% आहे.

आतापर्यंत 1.06 कोटी  (1,06,33,025) पेक्षा जास्त रुग्ण  बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 11,805 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 97.32% असून हा दर  जगातल्या सर्वोच्च दरापैकी एक आहे.

बरे झालेले आणि  सक्रीय रुग्ण यातले अंतर वाढून ते 1,04,96,153 आज झाले आहे.

31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. दमण आणि दीव, दादरा,नगर हवेली मध्ये  रुग्ण बरे होण्याचा दर 99.88% आहे.

गेल्या 24 तासात 17 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात मृत्यू नाही. लक्षद्वीप, सिक्कीम,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, चंदिगड, जम्मू-काश्मीर (केंद्र शासित प्रदेश)मेघालय, लडाख (केंद्र शासित प्रदेश). मणिपूर, हरियाणा, अंदमान निकोबार, राजस्थान, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली यांचा यात समावेश आहे.

6 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात नवा रुग्ण नाही. सिक्कीम, मेघालय, अंदमान निकोबार, नागालँड, त्रिपुरा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली यांचा यात समावेश आहे.

16 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 8 वाजेपर्यंत 87 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी  2021 ला या देशव्यापी लसीकरण अभियानाचा प्रारंभ केला आहे.

आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत 1,84,303 सत्रात 87,20,822 जणांनी लस घेतली आहे.

यामध्ये 61,07,120 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा)  1,60,291 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि 24,53,411 आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा (पहिली मात्रा)  समावेश आहे.

S.

No.

 

State/UT

Beneficiaries vaccinated

1st Dose

2nd Dose

Total Doses

1

A & N Islands

3,847

182

4,029

2

Andhra Pradesh

3,61,814

14,630

3,76,444

3

Arunachal Pradesh

16,613

1,574

18,187

4

Assam

1,28,613

3,862

1,32,475

5

Bihar

4,95,717

13,309

5,09,026

6

Chandigarh

9,212

144

9,356

7

Chhattisgarh

2,82,031

5,193

2,87,224

8

Dadra & Nagar Haveli

3,061

45

3,106

9

Daman & Diu

1,258

30

1,288

10

Delhi

2,02,125

4,047

2,06,172

11

Goa

13,166

517

13,683

12

Gujarat

6,90,074

9,278

6,99,352

13

Haryana

2,01,007

3,977

2,04,984

14

Himachal Pradesh

82,400

1,894

84,294

15

Jammu & Kashmir

1,45,600

1,849

1,47,449

16

Jharkhand

2,17,610

4,137

2,21,747

17

Karnataka

5,00,491

11,985

5,12,476

18

Kerala

3,67,367

3,570

3,70,937

19

Ladakh

2,904

77

2,981

20

Lakshadweep

1,776

0

1,776

21

Madhya Pradesh

5,75,728

0

5,75,728

22

Maharashtra

7,08,276

4,857

7,13,133

23

Manipur

25,452

319

25,771

24

Meghalaya

16,053

170

16,223

25

Mizoram

12,330

227

12,557

26

Nagaland

11,601

341

11,942

27

Odisha

4,16,756

10,034

4,26,790

28

Puducherry

6,320

193

6,513

29

Punjab

1,06,797

1,057

1,07,854

30

Rajasthan

6,18,919

8,791

6,27,710

31

Sikkim

8,543

0

8,543

32

Tamil Nadu

2,64,283

4,936

2,69,219

33

Telangana

2,79,237

14,205

2,93,442

34

Tripura

73,814

1,491

75,305

35

Uttar Pradesh

9,16,568

18,394

9,34,962

36

Uttarakhand

1,15,281

1,421

1,16,702

37

West Bengal

5,45,299

9,821

5,55,120

38

Miscellaneous

1,32,588

3,734

1,36,322

 

Total

85,60,531

1,60,291

87,20,822

लसीकरण अभियानाच्या 31 व्या दिवशी (15 फेब्रुवारी 2021) ला 4,35,527 लाभार्थींचे लसीकरण झाले. यापैकी 2,99,797 लाभार्थ्यांना 10,574 सत्रात पहिली मात्रा आणि 1,35,730 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. 

गेल्या 24 तासात देशात 9,121 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 80.54% रुग्ण 5 राज्यातले आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णांची सर्वात जास्त म्हणजे 3,365 नोंद झाली. केरळ मध्ये 2,884 आणि तामिळनाडू मध्ये  455 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 81 मृत्यूंची नोंद झाली.

या मृत्यूंपैकी 70.37% मृत्यू पाच राज्यातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त 23 मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये 13 आणि पंजाब मध्ये 10  मृत्यूंची नोंद झाली.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1698396) Visitor Counter : 219