पंतप्रधान कार्यालय

चेन्नईच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन / हस्तांतरण / पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 14 FEB 2021 6:08PM by PIB Mumbai

 

वनक्कम  चेन्नई

वनक्कम तामिळनाडू!

तामिळनाडूचे राज्यपाल  बनवारीलाल पुरोहित जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री  पलानीस्वामी जी, उपमुख्यमंत्री पन्नीरसिल्वम जी, तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष धनपाल जी, उद्योगमंत्री  संपत जी, मान्यवर, महिला व सज्जनहो ,

 

माझ्या प्रिय मित्रांनो,

आज चेन्नईत आल्यावर मला आनंद झाला. त्यांनी आज माझे आपुलकीने  स्वागत केल्याबद्दल मी या शहरातील लोकांचे आभार मानतो. हे शहर उर्जा व उत्साहाने भरलेले  आहे. हे ज्ञान आणि सर्जनशीलतेचे शहर आहे. चेन्नईतून आज आम्ही प्रमुख पायाभूत प्रकल्प सुरू करत आहोत. हे प्रकल्प नवसंशोधन  आणि स्वदेशी विकासाचे प्रतीक आहेत. या प्रकल्पांमुळे तामिळनाडूच्या विकासाला आणखी चालना मिळेल

 

मित्रानो,

हा कार्यक्रम विशेष आहे कारण आपण  सहाशे छत्तीस किलोमीटर लांबीच्या ग्रँड अनिकट कालवा प्रणालीच्या आधुनिकीकरणाचा पाया रचत आहोत. याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. यामुळे 2.27 लाख एकर जागेसाठी सिंचनाची सुविधा सुधारली जाईल. तंजावूर आणि पुडुकोट्टाई या जिल्ह्यांना विशेष लाभ होईल. विक्रमी अन्नधान्य उत्पादन आणि जलसंसाधनांचा चांगला वापर केल्याबद्दल मला तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे कौतुक करायचे आहे. हजारो वर्षांपासून, ही ग्रँड अनिकट  आणि तिची कालवा प्रणाली तामिळनाडूच्या भातशेतीची जीवनरेखा आहे. ग्रँड अनिकट हा आपल्या गौरवशाली भूतकाळाची जिवंत साक्ष आहे. आपल्या राष्ट्राच्या आत्मनिर्भर भारत उद्दिष्टासाठी  प्रेरणा आहे. प्रसिद्ध तामिळ कवी अव्वईयार यांच्या शब्दात-

वरप्पु  उयरा  नीर  उयरूम

नीर  उयरा  नेल  उयरूम

नेल  उयरा  कुड़ी  उयरूम

कुड़ी  उयरा  कोल  उयरूम

कोल  उयरा  कोण  उयरवान

जेव्हा पाण्याची पातळी वाढते , लागवड वाढते  तेव्हा लोक समृद्ध होतात  आणि राज्याची प्रगती होते.  पाण्याचे संवर्धन करण्यासाठी आपण शक्य ते सर्व करायला हवे . ही केवळ एक राष्ट्रीय समस्या  नाही. हा जागतिक विषय आहे. 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा, याची भविष्यातील पिढ्यांना मदत होईल.

 

मित्रानो,

याचा प्रत्येकाला आनंद होईल की आम्ही चेन्नई मेट्रो रेलच्या पहिल्या टप्प्यातील नऊ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन करत आहोत. हा मार्ग वॉशरमनपेट ते विमको नगर पर्यंत आहे. जागतिक महामारी असूनही हा प्रकल्प नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाला आहे. नागरी बांधकाम कामे भारतीय कंत्राटदारांनी केली होती. गाडीचे डबे (रोलिंग स्टॉक) स्थानिक पातळीवर खरेदी केले आहेत.  हे आत्मनिर्भर भारतला चालना देण्याच्या अनुषंगाने आहे. चेन्नई मेट्रो वेगाने वाढत आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील एकशे एकोणीस किलोमीटर अंतरासाठी ६३ हजार कोटी रुपये निधी राखून ठेवला आहे. एकाच वेळी कोणत्याही शहरासाठी मंजूर केलेलय मोठ्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. शहरी वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्याने येथील नागरिकांच्या जीवन सुलभतेत वाढ होईल.

 

मित्रानो,

सुधारित संपर्क व्यवस्थेमुळे सोय होते.  यामुळे व्यापारालाही मदत होते.

सुवर्ण चतुष्कोनचा एन्नोर -अट्टीपट्टू टप्पा हा सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. चेन्नई बंदर ते कामराज बंदर दरम्यान जलवाहतूक जलद गतीने सुरू करण्याची गरज आहे. चेन्नई बीच आणि अट्टीपट्टू दरम्यानचा चौथा मार्ग यात मदत करेल. विल्लुपुरम -तंजावर - तिरुवरुर प्रकल्पाचे विद्युतीकरण त्रिभुज जिल्ह्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल. या अठ्ठावीस किलोमीटरच्या या मार्गामुळे होणारी मोठी गोष्ट म्हणजे अन्नधान्यांची वेगवान हालचाल सुनिश्चित होईल.

 

मित्रानो,

दोन वर्षांपूर्वी, पुलवामा हल्ला झाला होता, हा दिवस कुणीही भारतीय विसरू शकणार नाही.   त्या हल्ल्यात गमावलेल्या सर्व हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली वाहतो. आपल्याला आपल्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. त्यांचे शौर्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील.

 

मित्रानो,

जगातील सर्वात जुन्या भाषेत लिहिताना, तमिळ, महाकवी सुब्रमण्य भारती म्हणालेः

आयुथम सेयवोम नल्ला काकीतम सेयवोम

आलेकल वाईप्पोम कल्वी सालाइकल वाईप्पोम

नडेयुम परप्पु मुनर वंडीकल सेयवोम

ग्न्यलम नडुनका वरुं कप्पलकल सेयवोम

याचा अर्थ:-

चला शस्त्रे बनवूया ; चला कागद बनवूया.

चला कारखाने उभारूया ; चला आपण शाळा बनवूया.

चला हलणारी आणि उडणारी वाहने बनवूया.

चला जगाला हादरवणारी जहाजं बनवूया.

या दृष्टीने प्रेरणा घेऊन भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. दोन संरक्षण कॉरिडोरपैकी एक तामिळनाडूमध्ये आहे. या कॉरिडॉरला आधीच आठ हजार शंभर कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची आश्वासने मिळाली आहेत. आज आपल्या सीमांच्या रक्षणासाठी देशाला आणखी एक योद्धा समर्पित केल्याचा मला अभिमान आहे.  स्वदेशी रचना आणि निर्मिती असलेले  मेन बॅटल टँक अर्जुन मार्क 1 सुपूर्द करताना मला अभिमान वाटत आहे. यात स्वदेशी दारुगोळा देखील वापरला जातो. तमिळनाडू आधीपासूनच भारतातील वाहन निर्मितीचे आघाडीचे केंद्र आहे.

आता मला तामिळनाडू भारताचा  टँक/ रणगाडा उत्पादन केंद्र म्हणून विकसित होताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये बनवलेल्या रणगाड्याचा उपयोग देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या उत्तर सीमेवर केला जाईल. हे भारताचे एकात्म भाव - भारत यांचे एकता दर्शन दाखवते. आम्ही आमच्या सशस्त्र सैन्याला  जगातील सर्वात आधुनिक सैन्य बनवण्याचे काम करत राहू. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर  बनविण्यावर भर देण्यात येत आहे. आमची सशस्त्र सेना भारताचे  धैर्य दर्शवते. आमच्या मातृभूमीचे रक्षण करण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत हे त्यांनी वारंवार आणि पुन्हा दर्शविले आहे. त्यांनी शांततेवर विश्‍वास ठेवल्याचे देखील त्यांनी वारंवार प्रदर्शन केले आहे. परंतु, भारत आमच्या प्रभुसत्तेचे सर्व किंमतीने संरक्षण करेल. आमच्या सैन्यात धीर, वीर भीती, सैन्य शक्ती आणि दुर्बल शक्ती उल्लेखनीय आहेत.

 

मित्रानो,

आयआयटी मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पसमध्ये जागतिक दर्जाच्या  संशोधन केंद्रांसाठी 2 लाख चौरस मीटर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मला खात्री आहे की लवकरच, आयआयटी मद्रासचा डिस्कवरी कॅम्पस शोधाचे  एक अग्रगण्य केंद्र बनेल. यात  संपूर्ण भारतातून सर्वोत्तम  प्रतिभा लक्ष वेधून घेईल.

 

मित्रानो,

एक गोष्ट निश्चित आहे- जग मोठ्या उत्साहाने  आणि सकारात्मकतेने भारताकडे पहात आहे. हे भारताचे दशक असणार  आहे आणि  130 कोटी भारतीयांचे परिश्रम आणि त्यांनी गाळलेल्या घामामुळे शक्य झाले आहे. वाढलेल्या आकांक्षा आणि नावीन्यतेला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा सरकारच्या सुधारणा  बांधिलकीचे दर्शन घडले आहे. तुम्हाला आनंद होईल या वर्षाच्या अर्थसंकल्पात भारताच्या किनारपट्टीच्या क्षेत्राच्या विकासाला विशेष महत्त्व दिले आहे .

भारताला आपल्या मच्छीमार समुदायाचा अभिमान आहे. ते परिश्रम व दयाळूपणाचे प्रतीक आहेत. अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी अतिरिक्त पत व्यवस्था निश्चित करण्याची तरतूद आहे. मासेमारीशी संबंधित पायाभूत सुविधा उन्नत केल्या जात आहेत. आधुनिक फिशिंग हार्बर चेन्नईसह पाच केंद्रांवर सुरु होईल. आम्ही शेवाळे  शेतीबद्दल आशावादी आहोत. यामुळे किनारपट्टीवरील लोकांचे जीवन सुधारेल. तमिळनाडूमध्ये शेवाळे  लागवडीसाठी बहुउद्देशीय सी-वीड पार्क तयार होईल.

 

मित्रानो,

भारत वेगाने भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढवत आहे.  आज, जगातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा निर्मिती भारतामध्ये होत आहे. अलिकडेच आम्ही आपल्या सर्व खेड्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह जोडण्याची मोहीम सुरू केली आहे.  त्याचप्रमाणे, जगातील सर्वात मोठा आरोग्य सेवा कार्यक्रम भारतात राबवला जात आहे. चाकोरीबाहेरच्या शिक्षण आणि तंत्रज्ञानाला महत्त्व देऊन शिक्षणक्षेत्रातही भारत परिवर्तन घडवत आहे. या घडामोडींमुळे तरुणांसाठी असंख्य संधी निर्माण होतील.

 

मित्रानो,

तामिळनाडूच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धनाच्या दिशेने काम करणे हा आमचा सन्मान आहे. तामिळनाडूची संस्कृती जागतिक स्तरावर लोकप्रिय आहे. आज, तामिळनाडूमधील देवेंद्रकुला वेलालार समुदायातील बंधू-भगिनींपर्यंत पोहचवण्यासाठी माझ्याकडे एक आनंददायक संदेश आहे. देवेंद्रकुला वेलालार या नावाने ओळखले जावे अशी त्यांची दीर्घकाळची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ते आता घटनेच्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या सहा ते सात नावांनी नव्हे तर वारसा नावाने ओळखले जातील. देवेंद्रकुला वेलालार म्हणून त्यांचे नाव दुरुस्त करण्यासाठी घटनात्मक अनुसूचीत सुधारणा करण्याच्या राजपत्र मसुद्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पुढील अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेसमोर मांडण्यात येईल. या मागणीबाबत  सविस्तर अभ्यासाबद्दल मी तमिळनाडू सरकारचे विशेष आभार मानू इच्छितो. या मागणीला त्यांचा पाठिंबा दीर्घ काळापासून आहे.

 

मित्रानो,

2015 मध्ये दिल्लीत देवेंद्रांकुला यांच्या प्रतिनिधींशी झालेली भेट  मी कधीही विसरू शकत नाही. त्यांचे दुःख दिसत होते. वसाहत राज्यकर्त्यांनी त्यांचा अभिमान आणि प्रतिष्ठा हिरावून घेतली. अनेक दशके काहीही झाले नाही. त्यांनी मला सांगितले- त्यांनी सरकारला वारंवार विनवणी केली , मात्र काहीही परिणाम झाला नाही. मी त्यांना एक गोष्ट सांगितली. मी म्हणालो की त्यांचे नाव देवेंद्र आणि माझे नाव नरेंद्र एका लयीत आहे.  मला त्यांच्या भावना समजलय. . हा निर्णय नाव बदलण्यापेक्षा अधिक वेगळा आहे. हा न्याय, सन्मान आणि संधी याबद्दल आहे. आपल्या सर्वांना देवेंद्र कुला समाजाच्या संस्कृतीतून बरेच काही शिकायला मिळते. ते सुसंवाद, मैत्री आणि बंधुभाव साजरे करतात. त्यांची एक सुसंस्कृत चळवळ होती. ती  त्यांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान आत्म-गौरव यांचे दर्शन घडवते.

 

मित्रानो,

आमच्या सरकारने श्रीलंकेतील आपल्या तमिळ बंधू-भगिनींच्या कल्याणाची आणि त्यांच्या आकांक्षांची नेहमीच काळजी घेतली आहे. जाफनाला भेट देणारे  एकमेव भारतीय पंतप्रधान हा  माझा सन्मान आहे. विकासकामांच्या माध्यमातून आम्ही श्रीलंकेच्या तमिळ समुदायाचे कल्याण सुनिश्चित करत आहोत. आमच्या सरकारने तमिळ लोकांना दिलेला निधी पूर्वीच्या तुलनेत बराच जास्त आहे. यात पुढील  प्रकल्पांचा समावेश आहे: ईशान्य श्रीलंकामधील विस्थापित तामिळ लोकांसाठी पन्नास हजार घरे. चहा मळे क्षेत्रात चार हजार घरे. आरोग्याच्या बाबतीत आम्ही मोफत रुग्णवाहिका सेवेसाठी अर्थसहाय्य दिले, जिचा तमिळ समुदायाद्वारे मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. डिकोयामध्ये एक रुग्णालय बांधले आहे. कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी जाफना व मन्नार या रेल्वे नेटवर्कचे पुन्हा बांधकाम केले जात आहे. चेन्नई ते जाफना पर्यंत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. . भारताने जाफना सांस्कृतिक केंद्र बांधले आहे याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे आणि आम्हाला आशा आहे की, जाफना सांस्कृतिक केंद्र लवकरच सुरू होईल. तामिळ हक्कांचा मुद्दाही आम्ही श्रीलंकेच्या नेत्यांकडे सातत्याने मांडला आहे. समानता, न्याय , शांतता आणि सन्मानाने त्यांना जगता यावे हे  सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत.

 

मित्रानो,

आपल्या मच्छिमारांना भेडसावणाऱ्या समस्या दीर्घकालीन आहे. मी समस्येच्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. परंतु मी आपल्याला खात्री देतो की माझे सरकार त्यांचे हित जपेल. जेव्हा जेव्हा मच्छिमार पकडले जातात तेव्हा आम्ही लवकरात लवकर  त्यांची सुटका सुनिश्चित केली आहे श्रीलंकेत. आमच्या कार्यकाळात सोळाशेहून अधिक मच्छिमारांना सोडण्यात आले आहे. सध्या श्रीलंकेच्या ताब्यात एकही भारतीय मच्छीमार नाही. तसेच तीनशे तेरा बोटी सोडवण्यात आल्या असून उर्वरित बोटी परत मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत  आहोत.

मानवी केंद्रीत दृष्टिकोनाने प्रेरित होऊन भारत कोविड -19 विरूद्ध जागतिक लढा अधिक मजबूत करत आहे. आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते करत राहणे आवश्यक आहे. आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांना आपल्याकडून हेच अपेक्षित होते. आज प्रारंभ झालेल्या विकासकामांसाठी मी पुन्हा एकदा तामिळनाडूच्या जनतेचे अभिनंदन करतो.

 

धन्यवाद..!

खूप-खूप धन्यवाद..!

वनक्कम !

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697943) Visitor Counter : 246