रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
आवश्यक मानकांची पूर्तता होत असल्यास सर्व प्रकारच्या पोलादाचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी करण्यास मंजुरी
महामार्गाच्या बांधकामाचा साठी खर्च कमी करणे सुनिश्चित करण्यासाठी उचलले पाऊल
दर्जावर परिणाम न करता निर्बंधित परीस्थितीत पुनर्विचार करण्याचे गडकरी यांचे प्रयत्न
Posted On:
14 FEB 2021 4:57PM by PIB Mumbai
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने असे आदेश जारी केले आहेत, की जर विशिष्ट गुणवत्तापूर्ण पोलादाची पूर्तता होत असल्यास सर्व प्रकारचे पोलाद जे धातूचा खडक , लहान वस्तू ,गोळ्या अथवा भंगार वितळवून केले आहे अशा पोलादाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी करता येईल. जे पोलाद वापरायचे असेल त्याची राष्ट्रीय परीक्षण आणि संशोधन प्रयोगशाळा प्रत्ययन मंडळाकडून (एनएबीएल) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तिऱ्हाईत व्यक्ती कडून चाचणी केल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल. हितसंबंधी आणि तंत्रज्ञ यांच्याशी चर्चा आणि विश्लेषण करून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या पूर्वी या कराराच्या तरतुदीनुसार केवळ प्राथमिक /एकात्मिक पोलाद उत्पादकांनी केलेल्या पोलादाचा वापर होत असे.अशा पोलादाच्या किंमतीत होणाऱ्या वाढीचा विचार करता याचा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावर परिणाम होऊ शकतो केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी दर्जावर परिणाम न करता निर्बंधित परीस्थितीत महामार्गांच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा पुनर्विचार करण्याचे सुचविले आहे.
हे पाऊल उचलल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी पुरवठा करणाऱ्यांमध्ये अधिक स्पर्धा वाढेल आणि त्यामुळे बाजारात चांगली किंमत देणाऱ्यांचा शोध घेतला जाईल.नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करणे,पुरवठादारांवरील निर्बंध कमी करणे आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक करणे या साठी मंत्रीमहोदय करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
***
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697927)
अभ्यागत कक्ष : 188