नौवहन मंत्रालय

2 मार्चपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या मेरीटाईम इंडिया समिट-2021 मध्ये 24 देश सहभागी होणार


पंतप्रधान व्हर्च्युअल समिटचे उद्घाटन करणार

Posted On: 11 FEB 2021 8:36PM by PIB Mumbai

 

2 ते 4 मार्च दरम्यान आभासी माध्यमातून होणाऱ्या दुसर्‍या मेरीटाईम इंडिया समिट-2021 मध्ये सुमारे 20,000 प्रतिनिधी, 24 भागीदार देश सहभागी होतील आणि 400 हून अधिक प्रकल्प प्रदर्शित केले जातील.  पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मार्च रोजी मेरीटाइम इंडिया समिट -2021 चे उद्घाटन करतील. बंदर, नौवहन व जलवाहतूक मंत्रालयाने औद्योगिक भागीदार फिक्की आणि ज्ञान भागीदार इवाय यांच्या संयुक्त विद्यमाने  हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आज कर्टन रेझर पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की मेरीटाइम इंडिया समिट (एमआयएस) आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ उपलब्ध करुन देईल आणि  ज्ञान आणि संधींचे परस्पर आदानप्रदान करण्यासाठी भागीदार देशांना एकत्र आणेल.

मनसुख मांडवीय आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेदरम्यान एमआयएस -2021 साठी एक माहितीपत्रक आणि www.maritimeindiasummit.in  संकेतस्थळ  देखील सुरू केले.  सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीच्या परिस्थितीमुळे संपूर्ण शिखर परिषद www.maritimeindiasummit.in  या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म वर आयोजित केली जाईल.  आजपासून अभ्यागत आणि प्रदर्शकांची नोंदणी सुरू होईल.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697218) Visitor Counter : 256