राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती भवनातील वार्षिक “उद्यानोत्सव” चा राष्ट्रपतींच्या हस्ते 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार


मुघल गार्डन्स सर्वसामान्य जनतेसाठी 13 फेब्रुवारीपासून खुली होणार

केवळ आगाऊ ऑनलाईन नोंदणीद्वारेच प्रवेश दिला जाणार

Posted On: 11 FEB 2021 8:04PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या वार्षिक उद्यानोत्सव चा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. सर्वसामान्य जनतेसाठी मुघल गार्डन्स 13 फेब्रुवारी ते 21 मार्च 2021 दरम्यान( सोमवारी देखभालीसाठी बंद वगळता) सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत खुली राहाणार आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून थेट प्रवेशाची सोय उपलब्ध असणार नाही. अभ्यागतांना केवळ आगाऊ ऑनलाईन नोंदणीद्वारेच गार्डन्स पाहाता येतील. ही नोंदणी पुढील लिंकवर करता येईल.. https://rashtrapatisachivalaya.gov.in  or https://rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx.

सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत सात पूर्व नोंदणीकृत सत्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. संध्याकाळी चार वाजता सर्वात शेवटच्या सत्रातील प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक सत्रात कमाल 100 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल आणि त्यांना मास्क परिधान करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे यांसारख्या कोविडप्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे लागेल. प्रवेशाच्या वेळी त्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. कोविड-19च्या संसर्गाची सर्वाधिक भीती असलेल्या व्यक्तींना प्रवेशाची अनुमती नसेल.

राष्ट्रपती भवनाच्या नॉर्थ ऍव्हेन्यूच्या जवळ प्रेसिडेंट्स इस्टेटच्या प्रवेशद्वार क्र. 35 मधून प्रवेश आणि निर्गमनाची सोय आहे.

अभ्यागतांनी पाण्याच्या बाटल्या, ब्रीफकेसेस, हँडबॅग/ लेडीज पर्स, कॅमेरे, रेडियो/ ट्रान्झिस्टर, खोके, छत्र्या, खाद्यपदार्थ सोबत आणू नयेत, अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. सार्वजनिक मार्गादरम्यान ठिकठिकाणी हँड सॅनिटायजर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार/ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मुघल गार्डन्सच्या वार्षिक उत्सवाव्यतिरिक्त लोकांना राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन वस्तुसंग्रहालयाला देखील भेट देता येईल तसेच चेन्ज ऑफ गार्ड सोहळा देखील पाहाता येईल. याबाबतचे तपशील http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour/  या लिंकवर उपलब्ध आहेत. 

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697202) Visitor Counter : 130