PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 10 FEB 2021 6:28PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image    Image

Image   Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 10 फेब्रुवारी 2021

 

भारतात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 1.41 लाख (1,41,511) पर्यंत घसरली आहे.  सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 1.30 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 5000 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्णांची नोंद झाली आहे.  दमण आणि दीव व दादरा आणि नगर हवेलीमध्ये सध्या एकही  सक्रिय रुग्ण नाही.

गेल्या 24 तासांत 11,067 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 13,087 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 2,114 इतकी निव्वळ घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी 71 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. एकोणीस राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ही राज्ये आहेत- उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, ओदिशा , आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर (केंद्रशासित प्रदेश ), झारखंड, पुदुचेरी, मणिपूर, नागालँड, लक्षद्वीप, मेघालय, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार  बेटे, लडाख (केंद्रशासित प्रदेश ), मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि दमण आणि दीव अन दादरा आणि नगर हवेली.देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,05,61,608 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर  97.27 टक्के आहे. 10 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, 66 लाख (66,11,561) लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड 19 लसीकरण अंतर्गत लस देण्यात आली  आहे. यापैकी 5,482,102 आरोग्य कर्मचारी आहेत तर 10,01,427 आघाडीवरचे कामगार आहेत. आतापर्यंत लसीकरणाची 1,34,746  सत्रे घेण्यात आली आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या 25 व्या दिवशी  (9फेब्रुवारी 2021)  7,990  सत्रांमध्ये 3,52,553  लोकांचे (एचसीडब्ल्यू - 1,28,032  आणि एफएलडब्ल्यू- 2,24,521) लसीकरण करण्यात आले.दररोज लसीकरण करण्यात येत असलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.68 टक्के रुग्ण 6 राज्यात आहेत.केरळमध्ये काल एका दिवसात 6,475  इतके  सर्वाधिक रुग्ण बरे झाले  गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2,554 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल कर्नाटकमध्ये  513  रुग्ण बरे झाले. काल आढळललेया  नवीन रुग्णांपैकी 83.31टक्के रुग्ण  6 राज्यातील  आहेत. केरळमध्ये काल 5,214 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,515, तर तामिळनाडूमध्ये 469  नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 94 मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन मृत्यूंपैकी 80.85 टक्के मृत्यू सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 35 मृत्यू झाले, केरळमध्ये 19 मृत्यू तर पंजाबमध्ये 8 मृत्यूची नोंद झाली आहे.

इतर अपडेट्स:

  • सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या(MOSPI), राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO)जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत संयोजित केलेल्या भारतातील सामाजिक आरोग्य विषयक गरजांच्या 75 व्या फेरीतील प्रमुख संकेतकांनुसार असे लक्षात आले आहे की, अखिल भारतीय पातळीवर 95.4% आजारांत अँलोपथीचा(पाश्चात्त्य वैद्यकीय पध्दती)वापर केला जातो तर 4.4% आजारांवर  आयुष पध्दतीने( AYUSH),आयुर्वेद,नॅचरोपॅथी, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी )उपचार केले जातात
  • कोविड 19 विरुद्धच्या लढाईत भारताने आणखी एक जागतिक शिखर सर केले आहे.कोविड 19 च्या लस प्रशासित करण्यामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे केवळ युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे.
  • देशातील लहान मुले, युवावर्ग आणि प्रजोत्पादक वयोगटातील स्त्रिया यांच्यात आढळणारी अनिमिया अर्थात रक्ताल्पतेची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये एएमबी अर्थात रक्ताल्पता मुक्त भारत धोरणाची आखणी करण्यात आली. या धोरणाविषयीची कार्यान्वयन दिशादर्शक तत्वे, प्रशिक्षण आणि आयईसी अर्थात माहिती शिक्षण आणि संपर्कविषयक साहित्य तयार करून ते या धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष माटेमाला सिरिल रामाफोसा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड-19 मुळे सातत्याने निर्माण होत असलेली आव्हाने आणि दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली लसीकरण मोहीम याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ फेब्रुवारी रोजी दोन रुग्णालयांची पायाभरणी केली आणि आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते यांच्यासाठी आसाम माला हा कार्यक्रम सुरू केला. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली, आसाम सरकारचे मंत्री आणि बोडोभूमी प्रादेशिक प्रांताचे प्रमुख प्रमोद बोरो उपस्थित होते.
  • महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेचा शुभारंभ ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालाा.

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रात मंगळवारी कोविड -19 चे  2 हजार 515 नवे रुग्ण आढळले. ताज्या अहवालानुसार , राज्यात  34 हजार 640 सक्रिय रुग्ण आहेत आणि 19,61,525  कोविड - 19 रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर  घरी सोडण्यात आले आहे. राज्यात मंगळवारी 35  कोविड -19 रुग्णांच्या  मृत्यूची नोंद झाली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.74% आहे तर मृत्युदर 2.51% आहे.  राज्यात मंगळवारपर्यंत 5 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणू प्रतिबंधक  लसीकरण करण्यात आले.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश राजेश टोपे यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील आणि सहव्याधी असणाऱ्या 50 वर्षांखालील लोकांचे लसीकरण करण्यात येईल. सध्या राज्यात  652 लसीकरण केंद्रे आहेत.  राज्यात दररोज सुमारे 40 हजार  ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येते. आतापर्यंत 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी  4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर आघाडीवर काम करणाऱ्या 5 लाख 47 हजार नोंदणी झाली असून त्यापैकी मंगळवारपर्यंत 41हजार 453 जणांचे लसीकरण करण्यात आले.

FACT CHECK

  

  

  

   

  

   

  

Image

Image 

 

* * *

MC/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696861) Visitor Counter : 164


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati