वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कार्यक्षम आणि टिकाऊ पॅकेजिंग ही पर्यावरणासाठी शाश्वत लॉजिस्टिक्सची गुरुकिल्ली
Posted On:
10 FEB 2021 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2021
पॅकेजिंग हे वापरकर्त्यांसाठी आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांदरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करते आणि कार्यक्षम आणि टिकाऊ पॅकेजिंग हे शाश्वत लॉजिस्टिक्सची गुरुकिल्ली आहे. संपूर्ण लॉजिस्टिकल कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीने पॅकेजिंगकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. 9 फेब्रुवारी रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या रसद विभागाने आयोजित केलेल्या सल्लामसलत बैठकीत विशेष सचिव (रसद) पवन अग्रवाल यांनी वरील निरीक्षणे नोंदविली.
ही सल्लामसलत बैठक नुकतेच अंतिम स्वरूप दिलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचा भाग म्हणून व्याप्ती आणि राष्ट्रीय पॅकेजिंग उपक्रमाची व्याख्या करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणे, उत्पादनाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि शाश्वततेला प्रोत्साहन देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. ही सल्लामसलत भारतीय उद्योग परिसंघ, खाद्य आणि पेय, ई-कॉमर्स अशा विविध उद्योगांसोबत करण्यात आली.
अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या पॅकेजिंग साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने या कंपन्यांना टिकाऊ पॅकेजिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले होते. धोकादायक आणि रासायनिक उत्पादनांकडे देखील पॅकेजिंगच्या दृष्टीकोनातून विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे यावेळी निदर्शनाला आले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696772)
Visitor Counter : 166