सांस्कृतिक मंत्रालय

ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन

Posted On: 09 FEB 2021 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

 

भारतीय पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय महत्त्वाची 3693 स्मारके देशात आहेत. प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थाने आणि अवशेष कायदा 1958 यानुसार या संरक्षित स्मारक/क्षेत्रांतील जागेवरील अतिक्रमणे हटविली जातात.

या कार्याचे प्रमुख पुरातत्व अधिक्षक  यांच्याकडे मालमत्ता अधिकाऱ्यांना दिलेले या क्षेत्रातील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस/आदेश जारी करण्याचे  (बेकायदेशीर अतिक्रमण हटविणे,कायदा 1971)) अधिकारही दिलेले असतात. अतिक्रमण कारवाई करण्यासाठी अथवा  हटविण्यासाठी संबंधित राज्य सरकार/पोलिस दल यांची मदत घेतली जाते आणि जेथे परिणाम होत नाही तेथे अतिक्रमण करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करत न्यायालयात खटला दाखल केला जातो. निवडक स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी  प्रभाग कर्मचाऱ्यांसह खाजगी सुरक्षारक्षक, राज्य पोलीस दल आणि केंद्रीय  औद्योगिक संरक्षण दल  यांची मदत देखील नियमित देखरेख करण्यासाठी घेतली जाते.

भारतीय पुरातत्व खात्याकडे  अशा 24 स्मारकांची यादी आहे जी अद्याप सापडलेली नाहीत.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने जुन्या नोंदी, महसूल नकाशे, आणि प्रकाशित अहवाल यानुसार क्षेत्रीय कार्यालयांच्या मदतीने अशी अद्याप न सापडलेली स्मारके शोधण्यासाठी /ओळखण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

देशातील केंद्र संरक्षित स्मारके/जागा यांची  राज्यनिहाय यादी खालील प्रमाणे

Sl.No.

Name of State / U.T.

No. of Monuments

 1.  

Andhra Pradesh

135

 1.  

Arunachal Pradesh

03

 1.  

Assam

55

 1.  

Bihar

70

 1.  

Chhattisgarh

46

 1.  

Daman & Diu (U.T.)

11

 1.  

Goa

21

 1.  

Gujarat

203

 1.  

Haryana

91

 1.  

Himachal Pradesh

40

 1.  

Jammu & Kashmir (U.T.)

56

 1.  

Jharkhand

13

 1.  

Karnataka

506

 1.  

Kerala

29

 1.  

Ladakh (U.T.)

15

 1.  

Madhya Pradesh

291

 1.  

Maharashtra

286

 1.  

Manipur

01

 1.  

Meghalaya

08

 1.  

Mizoram

01

 1.  

Nagaland

04

 1.  

N.C.T. Delhi

173

 1.  

Odisha

80

 1.  

Puducherry (U.T.)

07

 1.  

Punjab

33

 1.  

Rajasthan

163

 1.  

Sikkim

03

 1.  

Telangana

08

 1.  

Tamilnadu

412

 1.  

Tripura

08

 1.  

Uttar Pradesh

743

 1.  

Uttarakhand

43

 1.  

West Bengal

135

 

TOTAL

3693

सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1696529) Visitor Counter : 12