रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
‘सुरक्षित रस्ते आणि अपघातप्रवण क्षेत्र सुधारणा’ या विषयावर परिसंवाद
Posted On:
06 FEB 2021 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2021
‘सुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अपघातप्रवण स्थळे/वळणे यात येत्या एका वर्षात सुधारणा करण्यासाठीची योजना’ या विषयावर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे 3 आणि 4 फेब्रुवारीला नवी दिल्लीत वाहतूक भवनाच्या मिडीया सेंटर मध्ये एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
कोविड-19 विषयक सुरक्षा नियम लक्षात घेऊन, हा परिसंवाद, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरूपात आयोजित करण्यात आला होता, यात विविध सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि सल्लागार संस्थांच्या नऊ वक्ते सहभागी झाले होते. 20 प्रत्यक्षरित्या सहभागी झाले तर 850 जणांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता.
रस्ते महामार्ग विभागाचे सचिव गिरिधर अरमाने यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी सुरक्षित रस्त्यांवर भर देतांना अपघात होणार नाही अशाच पद्धतीने रस्त्यांची आखणी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यातूनही जर काही ठिकाणी रस्ते अपघातप्रवण असतील, तर तिथे अपघात झाल्यास, त्वरित उपचार करून जीव वाचवण्यासाठीची व्यवस्था असावी, असेही मत मांडले.
रस्ते विकास विभागाचे महासंचालक आय के पांडेय यांनी देखील आपल्या मुख्य भाषणात ह्या मतांना पाठींबा दिला. सर्व प्रादेशिक कार्यालयांनी राष्ट्रीय महामार्गांचे परीक्षण करतांना, इतर रस्त्यांवरच्या सुरक्षाविषयक बाबींवरही भर द्यावा, त्याची निरीक्षणे बनवून ती राज्य प्राधिकरणांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जावीत. सर्व मान्यवर वक्त्यांनी, सुरक्षा लेखापरिक्षण, रस्ते जंक्शन, द्रुतगती मार्ग, डोंगराळ मार्ग, रस्त्यांवरील सूचना आणि रस्त्यांचे सुरक्षा मानांकन अशा विषयांवर आपापली मते व्यक्त केली.
यंदा मंत्रालयातर्फे, सुरक्षा सप्ताहाऐवजी सुरक्षा माह साजरा केला जात असून तो 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान सुरु आहे. या महिनाभरात, अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695878)
Visitor Counter : 190