शिक्षण मंत्रालय

समग्र शिक्षा योजनेंतर्गत अनुदानित निवासी शाळा वा वसतीगृहांचे नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी शाळा/वसतीगृह असे नामकरण

Posted On: 05 FEB 2021 5:38PM by PIB Mumbai

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली म्हणून शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या समग्र शिक्षा या योजनेखाली अनुदानित निवासी शाळा/वसतीगृहांचे नामकरण नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी शाळा / वसतीगृह असे करावयाचा निर्णय घेतला आहे. नेताजीं सुभाषचंद्र बोस यांच्याशी  या शाळांचे  अश्या प्रकारे  बंध जुळले तर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल , शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही आपल्यातील उत्कृष्टतेची उच्चतम पातळी गाठण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे या निवासी शाळांच्या व वसतीगृहांच्या सुविधा दुर्गम भागातही माहिती होतील   व या शाळांना दर्ज्यात्मक शिक्षणात उच्च पातळी गाठता येईल.

समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शिक्षण मंत्रालय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना डोंगराळ, लहान व तुरळक वस्ती असणाऱ्या प्रदेशांमधील मुलांच्या नियमित शिक्षणासोबत निवारा व देखभालीची व्यवस्था व्हावी म्हणून निवासी शाळा व वसतीगृहे चालवण्यासाठी आर्थिक मदत पुरवते.

सुटका केलेले बालकामगार, स्थलांतरीत मुले, कुटुंबापासून दुरावलेली मुलेसामाजिक अस्थिरतेमुळे वा नैसर्गिक संकटांमुळे विस्थापित झालेल्या व्यक्ती आणि मुले   यांनाही निवासी सुविधा पुरवण्यात येते.

आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1063 निवासी उपक्रम ( 383 निवासी शाळा व 680 वसतीगृहे) मंजूर करण्यात आली आहेत.

समग्र शिक्षा अंतर्गत (एकूण)  मंजूरी मिळालेल्या निवासी शाळा व वसतीगृहांची यादी या दुव्यावर

 

S.

No

STATE NAME

Residential Schools

Hostels

1

ANDHRA PRADESH

3

14

2

ARUNACHAL PRADESH

155

54

3

ASSAM

3

1

4

BIHAR

6

9

5

CHHATTISGARH

67

39

6

DELHI

0

3

7

HARYANA

4

3

8

JHARKHAND

25

16

9

KARNATAKA

5

0

10

KERALA

0

6

11

LADAKH

0

2

12

MADHYA PRADESH

11

390

13

MAHARASHTRA

3

8

14

MANIPUR

9

8

15

MIZORAM

4

11

16

NAGALAND

7

11

17

ODISHA

3

18

18

PUNJAB

0

5

19

RAJASTHAN

7

34

20

SIKKIM

0

1

21

TAMIL NADU

13

0

22

TELANGANA

33

8

23

TRIPURA

4

14

24

UTTAR PRADESH

9

0

25

UTTARAKHAND

0

6

26

WEST BENGAL

12

19

Total

383

680

Generated as on Thursday, December 03, 2020

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695540) Visitor Counter : 200