नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात पहिली भारत-बहरीन संयुक्त कृतीगटाची बैठक

Posted On: 05 FEB 2021 12:06PM by PIB Mumbai

 

भारत आणि बहारिन  यांच्यात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील संयुक्त कृतीगटाची पहिली बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. बहारीनचे  स्थायी ऊर्जा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ अब्दुल हुसेन बिन अली मिर्झा यांनी बहारीन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव  दिनेश दयानंद जगदाळे यांनी केले. बहारिन मधील भारताचे राजदूत पीयूष श्रीवास्तव हे देखील बैठकीत सहभागी झाले होते.

नवीकरणीय उर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला  प्रोत्साहन देण्यासाठी जुलै 2018 मध्ये भारत आणि बहारिन यांच्यात सामंजस्य करार झाला होता .

कालची बैठक फलदायी झाली, यात दोन्ही देशांनी हवामान बदलांच्या उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी अक्षय उर्जेचे महत्त्व अधोरेखित केले आणि आपापल्या सरकारांनी घेतलेले पुढाकार, केलेली प्रगती व भविष्यातील उद्दीष्टे तसेच या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबाबत सादरीकरण केले.  अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यावर त्यांनी सहमती दर्शविली. या क्षेत्रातील विशेषत: सौर, पवन आणि स्वच्छ हायड्रोजन क्षेत्रातील संबंधित संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील दोन देशांच्या क्षमता वाढविण्याबाबत सहकार्यासाठी  दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.

सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात ही बैठक झाली. परस्पर सोयीच्या तारखांना संयुक्त कृतिगटाची बैठकीची पुढील फेरी घेण्याबाबत एकमत झाले, ज्याचा निर्णय राजनैतिक पातळीवर घेतला जाईल.

 

U.Ujgare/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695421) Visitor Counter : 221