आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आशा कार्यकर्त्यांसाठी योजना

Posted On: 02 FEB 2021 6:21PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2020-21 (19 जानेवारी 2021 पर्यंत) मध्ये भारत कोविड 19 आरोग्य यंत्रणा सज्जता आणि आपत्कालीन प्रतिसाद पॅकेज अंतर्गत कोविड 19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधासाठी  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 6309.91 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, कोविड 19 प्रतिसादासाठी कार्यरत असलेल्या आशा कार्यकर्त्यांसह सर्व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज विमा योजना सुरु केली आहे. ही विमा योजना कोविड 19 मुळे मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. भारत कोविड 19 पॅकेजअंतर्गत कोविड 19 प्रतिसादामध्ये कार्यरत आशांसाठी दरमहा 1000 रुपयांची तरतूद आहे. नोव्हेंबर, 2020 पर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 9,53,445 आशा आणि 36,716 आशा समन्वयकांना  पूरक कोविड 19 पेमेंट मिळाले आहे. अजूनपर्यंत कोणत्याही विलंबाची नोंद नाही.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

M.Iyengar/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1694501) Visitor Counter : 263