उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी आदिवासींची विशेष ओळख जपणारे विकास मॉडेल तयार करण्याचे केले आवाहन


आदिवासींचे उत्पनाचे स्त्रोत सुधारण्यासाठी त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करण्यावर उपराष्ट्रपतींनी दिला जोर

दिल्ली हाटमध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सव “आदि महोत्सव” चे केले उद्घाटन

Posted On: 01 FEB 2021 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

 

उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी आज आदिवासींची विशेष ओळख जपणारे विकास मॉडेल तयार करण्याचे आवाहन केले. “त्यांची संस्कृती ही त्यांची ओळख आहे”, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणताना ही संस्कृती अबाधित राहिली पाहिजे, असे ते म्हणाले.

 

नवी दिल्लीतील, दिल्ली हाट येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सव "आदि महोत्सव" च्या उद्घाटनानंतर आज एका फेसबुक पोस्टमध्ये उपराष्ट्रपती म्हणाले की आदिवासींच्या संस्कृतीचे कोणतेही नुकसान हे  मानवतेसाठी कधीही न भरून येणारे नुकसान असेल. आदिवासींच्या विकासाच्या क्षेत्रात अद्वितीय आव्हाने असल्याचे लक्षात घेऊन ते म्हणाले की, सरकारने आदिवासींची नेहमीच विशेष काळजी घेतली आहे.

 

आदिवासीचे अस्तित्व हे आदिम काळापासून असल्याचे लक्षात घेऊन उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांची जीवनशैली आद्य सत्य, चिरंतन मूल्ये आणि नैसर्गिक साधेपणा द्वारे निर्देशित आहे. “आदिवासींचे मोठेपण हे त्यांच्या आद्य आणि नैसर्गिक साधेपणावर टिकून राहिले आहे.”

 

विस्तृत आदिवासी हस्तकलेची दखल घेत उपराष्ट्रपतींनी आदिवासींच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती लोकप्रिय करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत सुधारण्यासाठी त्यांची नैसर्गिक कौशल्ये सुधारण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. नामांकित संस्थांकडून आदिवासी कारागीर आणि मुख्य प्रवाहातील डिझाइनर्स यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी  त्यांनी सरकारचे कौतुक केले.

 

आदिवासींची लोकसंख्या ही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8 टक्के असल्याचे  नमूद करून उपराष्ट्रपती म्हणाले की सर्वसमावेशक विकासाच्या राष्ट्रीय उद्देशाचा, आदिवासींचा विकास हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे.

* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694259) Visitor Counter : 109