संरक्षण मंत्रालय
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार) आणि अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रजासत्ताक दिन 2021 पुरस्कार केले प्रदान
उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला
Posted On:
28 JAN 2021 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार ) आणि अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी 28 जानेवारी , 2021 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलन 2021 मध्ये सहभागी झालेल्याना पुरस्कार आणि बक्षिसे प्रदान केली. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला.राजपथ येथे 26 जानेवारी 2021 रोजी देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि संरक्षण सामर्थ्याचे दर्शन घडवणारे 32 चित्ररथ सहभागी झाले होते. यात राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 17, विविध मंत्रालये / विभाग आणि निमलष्करी दलाचे नऊ आणि संरक्षण मंत्रालयाच्या सहा चित्ररथांचा समावेश होता.
विविध मंत्रालये / विभाग आणि निमलष्करी दलांच्या नऊ आणि संरक्षण मंत्रालयाच्या सहा चित्ररथांमध्ये जैव तंत्रज्ञान विभागाच्या चित्ररथाला सर्वोत्तम पुरस्कार मिळाला. आत्मनिर्भर भारत अभियान: कोविड,विविध प्रक्रियांच्या माध्यमातून लसीच्या विकासाची प्रक्रिया या चित्ररथातून दाखवण्यात आली होती. जैव तंत्रज्ञान विभाग सामाजिक प्रासंगिकतेसह नाविन्यपूर्ण उत्पादन विकासासाठी परिसंस्था तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693014)
Visitor Counter : 310