वस्त्रोद्योग मंत्रालय
जपानमध्ये वस्त्रोद्योग आणि वस्त्र प्रावरणे निर्यात करण्याला चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाची वस्त्रोद्योग समिती आणि जपानचे निस्सेनकेन क्वालीटी इव्हॅल्युएशन सेंटर यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2021 8:54PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाची वस्त्रोद्योग समिती आणि जपानचे निस्सेनकेन क्वालीटी इव्हॅल्युएशन सेंटर यांच्यातल्या औपचारिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याचा समारंभ आज दूर दृश्य प्रणाली द्वारे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2020 ला झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला मंजुरी देण्यात आली होती.केंद्रीय वस्त्रोद्योग, महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री यासुमासा नागसाका यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

वस्त्रोद्योग व्यापार आणि उद्योगाला चाचण्या, तपासणी, अनुरूपता मुल्यांकन, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी,संशोधन आणि विकास, सल्लामसलत याद्वारे जपानी ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सहाय्य पुरवणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे. जपानमध्ये वस्त्रोद्योग आणि वस्त्र प्रावरणे निर्यात करण्यासाठी चालना मिळून त्याद्वारे द्विपक्षीय व्यापार दृढ होण्याची अपेक्षा आहे.

अधिक तपशीलासाठी पहा-
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1692786)
आगंतुक पटल : 230