रेल्वे मंत्रालय
कोविड आव्हानाशी सामना करत असतानाच भारतीय रेल्वेच्या कोविडपूर्व काळाच्या तुलनेत 65% मेल एक्स्प्रेस सेवा सुरू
Posted On:
25 JAN 2021 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021
कोविड आव्हानाशी अजूनही सामना करत असतानाच भारतीय रेल्वेच्या 1138 गाड्या सध्या धावत आहेत. यात भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून दररोज धावणाऱ्या उत्सव एक्स्प्रेस गाड्यांचाही समावेश आहे. देशातील विविध महत्वाची गंतव्य स्थळे या विशेष गाड्यांद्वारे जोडली गेली आहेत. जास्तीत जास्त गाड्या रुळावर आणण्याच्या आवश्यकतेचा नियमित आढावा घेतला जात आहे.
कोविडपूर्व काळात भारतीय रेल्वेच्या सरासरी 1768 मेल/एक्स्प्रेस सेवा दररोज धावत होत्या.
जानेवारी 2021 महिन्यात आतापर्यंत मेल/एक्स्प्रेसच्या 115 फेऱ्यांना मान्यता मिळाली आहे.
याशिवाय, सध्या भारतीय रेल्वेच्या विविध विभागात दररोज 4807 उपनगरी रेल्वे सेवा कार्यरत आहेत. कोविडपूर्व काळात सरासरी 5881 उपनगरी रेल्वे सेवा कार्यरत होत्या.
याव्यतिरिक्त, 196 प्रवासी रेल्वे सेवाही भारतीय रेल्वेने सुरू केल्या आहेत. कोविडपूर्व काळात देशभरात मिळून 3634 प्रवासी रेल्वे सेवा कार्यरत होत्या.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692308)