संरक्षण मंत्रालय
भारताच्या शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सुधारित शौर्य पुरस्कार पोर्टलचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2021 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रजासत्ताक दिन 2021 च्या पूर्वसंध्येला आज शौर्य पुरस्कार पोर्टलची www.gallantryawards.gov.in ही सुधारित आवृत्ती सुरु केली. हे पोर्टल भारताच्या शौर्य पुरस्कारप्राप्त विजेत्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी एक व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. या पोर्टलवर राष्ट्रीय प्रश्नमंजुषा आणि ‘सेल्फी फॉर ब्रेव्हहेर्ट्स’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापासून, आमच्या शूर पुरुष आणि महिलांनी देशासाठी अनुकरणीय धैर्य आणि भक्ती दर्शविली आहे. या अनुषंगाने सुधारित शौर्य पुरस्कार पोर्टल सुरू करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
शौर्य पुरस्कार विजेत्यांनी, आपल्या देशाचे रक्षण करण्यासोबतच आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी योगदान देण्याकरिता देशातील भावी पिढ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. येत्या काही वर्षांत शौर्य पुरस्कार पोर्टल एक संवादात्मक, सहभागी आणि चैतन्यपूर्ण व्यासपीठ म्हणून रूपांतरित होईल जे नागरिकांमध्ये आणि विशेषतः युवकांमध्ये देशभक्ती आणि एकनिष्ठतेची भावना जागृत करेल असे ते म्हणाले. सुधारित शौर्य पुरस्कार पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी पोर्टलवर देशव्यापी शौर्य पुरस्कार प्रश्नमंजुषा देखील सुरू करण्यात आली आहे. देशातील हुशार नागरिकांना भारताच्या शौर्य पुरस्काराविषयी असलेले ज्ञान दर्शविण्याची संधी प्रदान करणे हे या प्रश्नमंजुषेचे उद्दिष्ट आहे.
S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1692221)
आगंतुक पटल : 552