आयुष मंत्रालय
“आयु संवाद” अभियान
(माझे आरोग्य माझी जबाबदारी)
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2021 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021
“आयु संवाद” (माझे आरोग्य माझी जबाबदारी) हे आयुर्वेद आणि कोविड-19 महामारी या विषयांबाबत मोठ्या प्रमाणावर चालविण्यात येत असलेल्या अनेक जनजागृती अभियानांपैकी एक अभियान आहे. हे अभियान नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्याच्या वतीने आयोजित करण्यात आले असून आयुष मंत्रालयाने ह्या अभियानाची संकल्पना मांडून त्याला संपूर्ण समर्थन दिले आहे. या अभियानाअंतर्गत भारतीय नागरिकांसाठी देशभरात आयुर्वेद तज्ञांची 5 लाखांहून अधिक व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.
अभियानाचे उद्दिष्ट :
“कोविड-19 महामारी आटोक्यात आणण्यासाठी आयुर्वेद” या संकल्पनेवर आधारित व्याख्यानांच्या मालिकेद्वारे सामान्य जनतेमध्ये जाणीव निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतभरात 5 लाख व्याख्यानांचे आयोजन करून त्यामध्ये संरचनात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी लोकांपर्यंत एकसमान माहिती पोहोचण्याची निश्चिती या अभियानाद्वारे होणार आहे.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1692199)
आगंतुक पटल : 287