उपराष्ट्रपती कार्यालय

हैदराबादच्या डॉ एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलामध्ये उपराष्ट्रपतींनी केले दोन नवीन सुविधांचे उद्‌घाटन


क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भरतेच्या समीप नेल्याबद्दल डीआरडीओचे कौतुक

शस्त्रे आयात करणाऱ्या देशापासून निर्यातदार देश अशी ओळख निर्माण करण्याचा भारताचा दृष्टिकोन - उपराष्ट्रपती

डीआरडीओला भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले

कोविड -19 विरुद्धचा भारताचा लढा हा विषाणू प्रतिबंधाची यशोगाथा सांगतो - उपराष्ट्रपती

कोविड -19 ची लस विक्रमी वेळेत बनविल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांचे कौतुक केले; ही लस प्रत्येक भारतीयापर्यंत लवकरच पोहोचेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली

कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात मनापासून सहकार्य केल्याबद्दल त्यांनी डीआरडीओचे कौतुक केले

Posted On: 25 JAN 2021 1:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

कठोर परिश्रम, समर्पण व चिकाटीच्या जोरावर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला आत्मनिर्भरतेच्या समीप नेल्याबद्दल उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज डीआरडीओ अर्थात संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे कौतुक केले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवणे हे केवळ देशासाठी महत्वपूर्ण किंवा सामरिक महत्वाचे  नाही तर 2018 मध्ये क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण करारावर (एमटीसीआर) स्वाक्षरी होण्यापूर्वी विकसित देशांच्या उच्चतम क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्यासाठी भारताचे अनुकरण आहे. डीआरडीओने अनेक स्वदेशी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करून या संकटाचे संधीमध्ये रुपांतर केले असे नायडू म्हणाले.

शस्त्रे आयात करणाऱ्या सर्वात मोठ्या देशाकडून संरक्षण सामग्री करणारा सर्वोच्च निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण करण्याच्या भारताच्या वाटचालीबद्दल नायडू यांनी संतोष व्यक्त केला. संरक्षण सामग्री निर्यातीत अलीकडेच 7 पट वाढ झाली असली तरीही भारताची संरक्षण निर्यात अजूनही कमी असल्याचे अधोरेखित करीत ते म्हणाले की, निर्यात मूल्याचे संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात बराच वाव आहे. त्यांनी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना देशाच्या भविष्यातील संरक्षणविषयक गरजाच नव्हे तर निर्यात करता येणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख पटवून देण्यास सांगितले.

कोविड -19 महामारीमुळे लोकांच्या विशेषतः गरिबांच्या जीवनावर अभूतपूर्व परिणाम झाला आहे हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रसार रोखण्यात भारत सरकारने दिलेल्या प्रतिसादाचे नायडू यांनी कौतुक केले. कोविड -19 ची लस विक्रमी वेळेत बनविल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांचे कौतुक केले तसेच ही लस प्रत्येक भारतीयापर्यंत लवकरच पोहोचेल आणि ही महामारी संपुष्टात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुल येथे डीआरडीएल सेमिनार हॉल व क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रदर्शन हॉल आणि एअर कमोडोर व्ही. गणेशन इंटिग्रेटेड वेपन सिस्टम डिझाईन अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या दोन नवीन सुविधांचे उद्‌घाटन उपराष्ट्रपतींनी केले.

यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, महासंचालक (क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त प्रणाली) एमएसआर प्रसाद, डीआरडीओचे वैज्ञानिक उपस्थित होते.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692126) Visitor Counter : 152