संरक्षण मंत्रालय

अंदमान समुद्रात संयुक्त सराव: सराव कवच

Posted On: 21 JAN 2021 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2021


अंदमान आणि निकोबार कमांड (एएनसी) या भारताच्या एकमेव संयुक्त सैन्य दलाच्या वतीने भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाईदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त सैन्य सरावाचे 'सराव कवच' चे आयोजन येत्या आठवड्यात करण्यात आले आहे. या सराव सत्रात नौदलाच्या विशेष तुकड्यां, पायदळ लढाऊ वाहने, सैन्य दलाच्या उभयचर ब्रिगेडच्या घटकांसह नेव्ही, आर्मर / मेकेनाइज्ड घटक, विनाशिका, एएसडब्ल्यू कॉर्व्हेट्स आणि पूर्व नौदल विभाग आणि एएनसीची हेलिकॉप्टर्स तैनात असलेली जहाजे, जग्वार सागरी लढाऊ विमाने, भारतीय हवाईदलाकडून विमान परिचालन आणि तटरक्षक दलाची मालमत्ता यासह लष्कराच्या उभयचर तुकड्या यांचा सहभाग आणि तैनाती अपेक्षित आहे.

या सरावात सागरी मालमत्तेची देखरेख, हवाई व सागरी हल्ल्याचा समन्वय, हवाई संरक्षण, पाणबुडी आणि लँडिंग ऑपरेशन्सचा एकत्रित वापर समाविष्ट आहे. तीनही दलांमधील विविध तांत्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि मानवी गुप्तचर यंत्रणांचा समावेश असणारा संयुक्त गुप्तचर देखरेख आणि टेहळणी सराव केला जाईल. कारवाईच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्वरित निर्णय घेण्याकरिता लढाईच्या क्षेत्रात पारदर्शकता प्राप्त करण्यासाठी अंतरिक्ष, हवा, जमीन आणि समुद्र-आधारित मालमत्ता / सेन्सर, त्याचे विश्लेषण आणि सामायिकरण यांच्याकडून गुप्त माहिती गोळा करण्याची क्षमता आयएसआर सराव प्रमाणित करेल.

संयुक्त दलातर्फे अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये उच्च तीव्रतेच्या आक्रमक आणि बचावात्मक कृती, जमीन, पाणी तसेच हवेत उतरण्याचा सराव, हेलिकॉप्टर्सद्वारे समुद्रातून विशेष दलाना अंतर्भूत करणे इत्यादी सराव घेण्यात येणार आहे. या तिन्ही दलांच्या संयुक्त सरावाचा उद्देश संयुक्त लढाऊ क्षमता विकसित करणे हा आहे.


* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691606) Visitor Counter : 328