उपराष्ट्रपती कार्यालय

‘सार्वत्रिक ऐक्य’ या तत्त्वज्ञानाद्वारे भारत जगाला मार्ग दाखवू शकतो: उपराष्ट्रपती

Posted On: 22 JAN 2021 8:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

वसुधैव कुटुंबकम्’ हा भारतीय वैश्विक दृष्टिकोन मानवतेला भेडसावणाऱ्या समकालीन समस्यांसाठी मार्ग दाखवू शकेल असे मत उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी व्यक्त केले. द्वेष, हिंसाचार, कट्टरता, सांप्रदायिकता आणि फूट पाडण्याच्या अन्य प्रवृत्तींमुळे अनेक देशांचे आणि समुदायांचे सामाजिक संबंध लोप पावत असताना ‘सार्वत्रिक ऐक्य’ हे प्राचीन भारतीय तत्वज्ञान विशेष प्रासंगिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय जीवनशैलीमध्ये लोकशाही निष्ठा असल्याचे सांगून नायडू म्हणाले की, आपण प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या इतकेच महत्त्व देतो. ते म्हणाले की, आपली सांस्कृतिक मूल्ये मानवातील विविधता ओळखतात आणि आपण त्याच ‘देवत्वाचा ’ भाग असल्यामुळे या विविधतेत अंगभूत संघर्ष नाही. अशा जागतिक दृष्टिकोनातून परस्पर आदर, शांतीपूर्ण सहकार्य आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक प्रगती साध्य करण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्न केले जातात असे उपराष्ट्रपती म्हणाले.

प्रा जी के. शशिधरन यांनी केलेला श्री नारायण गुरुदेव यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद, नॉट मेनी, बट वन (दोन खंड) च्या आभासी प्रकाशनादरम्यान नायडू बोलत होते. आधुनिक भारतावर संतांचा प्रचंड प्रभाव लक्षात घेऊन उपराष्ट्रपती म्हणाले की श्री नारायण गुरु बहुआयामी प्रतिभावंत , एक महान महर्षी, अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रख्यात प्रसारक , एक प्रतिभावान कवी आणि एक महान तत्वज्ञानी होते.

उपराष्ट्रपतींनी श्री नारायण गुरु यांची उल्लेखनीय समाजसुधारक ही भूमिका अधोरेखित केली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या चळवळीत आणि सामाजिक भेदभावाच्या विरोधात ते आघाडीवर होते.

सविस्तर माहितीसाठी ईथे क्लिक करा

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691364) Visitor Counter : 224