संरक्षण मंत्रालय

स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची हॉक-I मधून यशस्वी चाचणी

Posted On: 22 JAN 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

देशात विकसित केलेल्या स्मार्ट अँन्टी एअरफिल्ड वेपनची, हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेडच्या  हॉक-I या लढाऊ विमानामधून यशस्वी चाचणी घेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने नवे शिखर साध्य केले आहे. ओदिशाच्या किनाऱ्यावर 21 जानेवारी 2020 ला ही चाचणी घेण्यात आली. 

भारतीय हॉक- एमके 132 मधून हे वेपन डागण्यात आले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने या वेपनची नवव्यांदा यशस्वी चाचणी केली आहे.  निर्धारित सर्व लक्ष्य या वेपनने साध्य केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन केंद्र इमारत-आरसीआय, हैदराबाद ने हे वेपन विकसित केले आहे. 125 केजी वर्गातले हे स्मार्ट वेपन100 किमी परिसरातशत्रूच्या  रडार, बंकर, रनवेवर मारा करू शकते. याआधी या वेपनची जग्वार विमानातून चाचणी करण्यात आली होती.

या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी या चमूचे अभिनंदन केले आहे.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691209) Visitor Counter : 218