रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

आयआयटी रुरकी मध्ये रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालयाची 'प्रोफेशनल चेअर' जारी ठेवण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 22 JAN 2021 2:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021

रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय आणि आयआयटी रुरकी यांनी  आज  रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालयाची, महामार्ग पायाभूत विकास क्षेत्रात संशोधन आणि विकास, अध्यापन आणि प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करणारी प्रोफेशनल चेअर (अध्यापकाचे पद ) कायम ठेवण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. रस्ते विकास महासंचालक  आणि विशेष सचिव इंद्रेश कुमार पांडे आणि आयआयटी रुरकीच्या सिव्हील इंजिनियरिंगचे प्राध्यापक आणि उपसंचालक मनोरंजन परिदा यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारामुळे रस्ते क्षेत्रात संशोधन आणि विकासाला बळकटी मिळणार आहे. महामार्ग पायाभूत विकास क्षेत्रात समन्वित संशोधन आणि विकास, अध्यापन याबाबत चेअर प्रोफेसर पुढाकार घेईल, अशी अपेक्षा आहे.

या कराराद्वारे भागीदारी औपचारिक करण्याचा निर्णय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय आणि आयआयटी रुरकी या दोन्हीसाठी महत्वाचा असल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. रस्ते, पूल, बोगदे प्रकल्पांचा  बांधकामांचा काळ आणि खर्च कमी राहावा यासाठी स्वदेशी आणि योग्य तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकाराची हा करार म्हणजे परिणती आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संशोधन संस्था आणि शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध तज्ञ यांचे ज्ञान उपयोगात आणले जात आहे. 

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691201) Visitor Counter : 132