मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
देशातील एव्हिअन इन्फ्लूएंझाची (बर्ड फ्लू) सद्यस्थिती
Posted On:
20 JAN 2021 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
देशात आज, दि. 20 जानेवारी, 2020 पर्यंत एव्हिअन फ्लूचा प्रादुर्भाव सहा राज्यामधल्या (केरळ, हरयाणा, मध्यप्रदेश, महराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब) कुक्कुटपालन केंद्रात आणि 10 राज्यांमध्ये (मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान आणि पंजाब) कावळे, स्थलांतरित पक्षी तसेच वन्य पक्षांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि हरियाणा मधील या बाधित भागात नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे.
देशातील बाधित भागाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय पथकाने महाराष्ट्रातील सातारा, लातूर, परभणी आणि बीड जिल्ह्यांचा दौरा केला.
एव्हिअन इन्फ्लूएंझा 2021 ची तयारी, नियंत्रण आणि प्रतिबंध यासासाठी तयार केलेल्या सुधारित कृती योजनेच्या आधारे सर्व राज्ये राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबिलेल्या नियंत्रण उपाययोजनांबाबत दररोज विभागाला अहवाल पाठविला जातो.
विभाग ट्विटर, फेसबुक हँडल या सोशल मीडिया व्यासपिठांच्या माध्यमातून एव्हीयनविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत आहे.
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690608)
Visitor Counter : 71