पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हजिरा येथे शेल इंडियाच्या एलएनजी ट्रक लोडिंग युनिटचे उद्घाटन केले
भारताच्या स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले
Posted On:
19 JAN 2021 4:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज गुजरातच्या हजिरा येथे शेल इंडियाच्या एलएनजी ट्रक लोडिंग युनिटचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, यामुळे गॅस पाइपलाइन नसलेल्या ऑफ-ग्रीड भागात नैसर्गिक वायूची उपलब्धता वाढेल आणि दूरच्या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये एलएनजीच्या वापरास चालना मिळेल.

आज हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल शेल इंडियाच्या चमूचे कौतुक करताना प्रधान म्हणाले की, एलएनजी क्षेत्रातील वाढती स्पर्धा नवीन बाजारपेठेची निर्मिती, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात तसेच उद्योगांना स्वच्छ इंधन मिळवून देण्यात आणि पर्यावरण संवर्धनात मदत करेल. ते म्हणाले की भारताच्या स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने हे आणखी एक मोठे पाऊल आहे. "वायू आधारित अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी, हवामान बदलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी आपल्या उर्जा मिश्रणात स्वच्छ उर्जा प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." एलएनजीला वाहतूक इंधन म्हणून चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देत भारताच्या पर्यावरणीय तसेच स्वच्छ उर्जा संक्रमण उद्दिष्टांना मदत करण्याच्या या प्रयत्नांबद्दल त्यांनी शेल इंडियाचे अभिनंदन केले.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690018)
Visitor Counter : 146