कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याचे सुनिश्चित करते: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 17 JAN 2021 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2021


केंद्रीय पूर्वोत्तर प्रदेश विकास (DoNER),पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय,अणूऊर्जा आणि अंतरीक्ष  विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आज नवी दिल्ली येथे म्हणाले की, कार्मिक मंत्रालयाने नुकतीच सुरू केलेली इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट आँर्डर (PPO) जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याचे सुनिश्चित करते.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की कार्मिक मंत्रालयाच्या  निवृत्तीवेतन विभागात नेहमी जेष्ठ नागरिकांकडून पेन्शन पेमेंट ऑर्डरच्या मूळ प्रती गहाळ झाल्याच्या  तक्रारी येत असत.  

पंतप्रधानांनी  डिजीटलायझेशनवर भर दिल्याची प्रशंसा करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, की गेल्या सहा वर्षांत या दिशेने वेगाने प्रगती झाली आहे आणि भारत सरकारमधील अनेक मंत्रालये आ विभाग  कोविड महामारीचा प्रादुर्भाव होण्या आधीपासूनच ई माध्यमातून जवळपास 80% कार्य करत आहेत. त्यांनी निवृत्तीवेतन विभागातील ज्या अधिकाऱ्यांनी कोविड महामारीने  उच्चांक गाठला असताना इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट आँर्डर पध्दतीला यशस्वीपणे आरंभ केला त्या सर्वांचे  डॉ. सिंह  यांनी अभिनंदन केले, ज्यामुळे अनेक निवृत्तअधिकारी जे टाळेबंदीच्या काळात सेवानिवृत्त झाले आणि ज्यांना शारिरीक दृष्ट्या पीपीओची हार्ड काँपी मिळणे कठीण झाले होते,त्यांच्यासाठी ते वरदान ठरले.

महानियंत्रक आणि  लेखापाल(CGA) यांचानिवृत्तीवेतन आणि निवृत्त कल्याण विभागाने,सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन यंत्रणेमधून(पीएफएमएस) इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंटची  महानियंत्रक आणि  लेखापाल(CGA) यांच्या आदेशानुसार ,  डिजिटल लॉकरमध्ये  एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे निवृत्तीवेतन धारकांना डिजी लाॅकर मधून त्वरित त्याची नवीनतम छापील प्रत मिळण्याची सोय उपलब्ध झाली.


* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689538) Visitor Counter : 175