उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्र्पतींनी तरुणांना नोकरी शोधण्याऐवजी रोजगारनिर्मिती करण्याचे केले आवाहन

Posted On: 17 JAN 2021 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2021

 

माजी राष्ट्रपती डॉ. ए जे जे अब्दुल कलाम यांच्यावरील तामिळ पुस्तकाचे चेन्नईच्या राजभवनात केले प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती  वेंकैया नायडू यांनी भारताची विकास गाथा लिहिण्यासाठी तरुणांना आघाडीवर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी आज चेन्नईच्या राजभवनात माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या तामिळ भाषेतील जीवन चरित्राचे प्रकाशन केले. डॉ. कलाम यांची भाची डॉ. एपीजेएम नाझीम मरायकायर आणि सुप्रसिद्ध खगोल वैज्ञानिक डॉ. वाय.एस. राजन यांनी "अब्दुल कलाम- निनाईवुगलुककुमारानामिलाइ" हे पुस्तक लिहिले आहे. तमिळ भाषेत पुस्तक आणल्याबद्दल लेखकांचे कौतुक करताना ते म्हणाले की मातृभाषेत लिखाण हा जनतेपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग आहे.

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे इथली मोठी लोकसंख्या आहे, हे लक्षात घेऊन नायडू यांनी कृषी ते उत्पादन या विविध क्षेत्रातील जलदगती प्रगतीसाठी याचा पुरेपूर लाभ घेण्याचे आणि येत्या काही वर्षांत सातत्यपूर्ण विकास दर सुनिश्चित करण्याचे आवाहन केले

माजी राष्ट्रपतींना श्रद्धांजली वाहताना नायडू यांनी डॉ. कलाम यांच्या पुस्तकातून एक पान काढून स्वतःवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “त्यांनी  नोकरी शोधण्याऐवजी नोकरी-देणारे होण्याची आकांक्षा बाळगायला हवी ,” असे ते पुढे म्हणाले.

प्राथमिक शिक्षणापासूनच शिक्षण हा आनंददायी अनुभव बनवण्यासाठी  शिक्षणपद्धती बदलण्याची गरज व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि चिकित्सात्मक  विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

युवा कलावंतांना जागृत करण्याच्या डॉ कलाम यांच्या आवडीची आठवण करून देताना उपराष्ट्रपती म्हणाले की ते नेहमी शाळांना भेट देत असत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत.

माजी राष्ट्रपतींचा समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर ठाम विश्वास होता असे उपराष्ट्र्पती म्हणाले. 

ते म्हणाले की डॉ. कलाम यांनी मागे ठेवलेल्या आत्मविश्वासाच्या वारसामुळे शास्त्रज्ञांना आज स्वदेशी  लस विकसित करण्यास प्रवृत्त केले आहे. “वैद्यकीय उपकरणांसह  माफक प्रमाणात सुरूवात करून आता आपण पीपीई किट्स, एन95 मास्क  आणि व्हेंटिलेटर इतर देशांमध्ये निर्यात करत आहोत,” असे उपराष्ट्रपती म्हणाले.

संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689396) Visitor Counter : 187