संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांच्यात बैठक
Posted On:
16 JAN 2021 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021
नेपाळचे संरक्षण मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली. सहाव्या भारत नेपाळ संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी परराष्ट्रमंत्री भारतात आले आहेत. परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान परराष्ट्रमंत्र्यांनी नेपाळच्या नेतृत्वाने दिलेल्या शुभेच्छा संरक्षण मंत्र्यांना दिल्या आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्याची इच्छा प्रकट केली. भारताने केलेल्या सर्व सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. राजनाथ सिंह यांनी देखील तशाच भावना व्यक्त केल्या आणि भारत आणि नेपाळमधील संबंधांना उभय देशांच्या जनतेमधील परस्पर संबंधांमुळे प्रोत्साहन मिळते असे सांगितले.
संरक्षणमंत्र्यांनी नेपाळच्या नेत्यांबरोबरचे वैयक्तिक संबंध, दीर्घ मैत्री तसेच नेपाळमधील जनतेप्रति आदर व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या सैन्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. नेपाळला मानवतावादी सहकार्य करायला आणि आपत्ती निवारण प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीसाठी भारत मदतीसाठी तयार असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे कोविड लस विकसित करण्यात मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि लवकरच या महामारीवर विजय मिळवता येईल असा विश्वास व्यक्त केला.
संरक्षणमंत्री म्हणाले, की भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक दृढ आणि बळकट करण्यासाठी भारत उत्सुक आहे.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689150)
Visitor Counter : 1496