अर्थ मंत्रालय
एसपीएमसीआयएलने 215.48 कोटी रुपये लाभांश दिला
Posted On:
14 JAN 2021 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या (डीईए) प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या संपूर्णतः भारत सरकारच्या मालकीच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिन्टींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल) ने आर्थिक वर्ष 2019-20 साठी भारत सरकारला 215.48 कोटी रुपयांचा अंतिम लाभांश दिला. हा लाभांश 31 मार्च 2020 पर्यंतच्या कंपनीच्या निव्वळ मुल्याच्या 5% आहे. [आर्थिक वर्ष 2019-20 साठी करानंतरच्या नफ्याच्या (पीएटी) 41%]
एसपीएमसीआयएलने वर्ष 2019-20 मध्ये बँक नोट्स, नाणी, सुरक्षा कागद, पारपत्र, सुरक्षा शाई आणि इतर सुरक्षा उत्पादनांच्या उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. एसपीएमसीआयएलने 2019-20 मध्ये 9824 दशलक्ष बँक नोट्स, 3282 दशलक्ष नाणी, 7010 मेट्रिक टन (एमटी) सुरक्षा पेपर, 851 मेट्रिक टन (एमटी) सुरक्षा शाईचे उत्पादन केले आहे. वर्ष 2019-20 मध्ये कंपनीच्या व्यवहारामधून 4,966 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून कराआधीच्या नफ्यात वाढ होऊन तो 1,026.79 कोटी रुपये झाला आहे.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688605)
Visitor Counter : 202