पोलाद मंत्रालय

"बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात पोलादासाठी नवीन संधी" या विषयावर वेबिनारचे आयोजन

Posted On: 14 JAN 2021 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021

 
पोलाद मंत्रालय आणि इंडियन स्टील असोसिएशन(ISA) यांच्या संयुक्त विद्यमाने "बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात पोलादासाठी नवीन संधी" या विषयावरील वेबिनारचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय पोलाद, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान हे प्रमुख पाहुणे आणि पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते हे आदरणीय अतिथी म्हणून या समारंभात उपस्थित राहणार आहेत.

पोलादासाठीच्या नवीन संधी आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात पोलादाच्या उपयुक्तता यावरील दृष्टिक्षेप या विषयावर वेबिनारमधे लक्ष केंद्रीत करण्यात येईल. पोलाद, बांधकाम आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील प्रमुख उद्योजक या वेबिनारमधे सहभागी होणार आहेत.

वेबिनार आयोजित केल्याबद्दल आयएसएचे अभिनंदन करताना दिलेल्या संदेशात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, की अलिकडच्या काळात भारतीय पोलाद उद्योगाने प्रचंड वाढ दर्शवली आहे. उत्पादनातील वेगवान वाढीमुळे भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा क्रूड स्टील उत्पादन करणारा देश बनला आहे.

बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे 65-67% पोलादाचा वापर होतो. म्हणून पोलादाच्या वापराच्या नवीन संधी ओळखण्याची गरज आहे, असे पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी म्हटले आहे.

 

* * *

S.Tupe/S.Partagonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688553) Visitor Counter : 217