संरक्षण मंत्रालय
सी व्हिजिल 21 हा किनारपट्टी संरक्षण सराव संपन्न
Posted On:
14 JAN 2021 1:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021
'सी व्हिजिल 21' हा दोन दिवसीय किनारपट्टी संरक्षण सराव 12 आणि 13 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. सी व्हिजिलच्या संकल्पनात्मक आणि भौगोलिक विस्तारामध्ये देशातील संपूर्ण किनारपट्टी आणि ईईझेडचा समावेश होता आणि शांतता ते युद्धाचा काळ दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींचा सराव करण्यात आला. याव्यतिरिक्त, किनारपट्टीवरील सुरक्षेचे उल्लंघन झाल्यास ते रोखण्यासंबंधी उपायांना देखील मान्यता देण्यात आली.
या सरावात संपूर्ण किनारपट्टी सुरक्षा यंत्रणा तैनात करणे आणि भारतीय नौदल (आयएन) आणि तटरक्षक दल (सीजी) च्या 110 हून अधिक तुकड्या सहभागी झाल्या होत्या. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात सागरी पोलिस आणि सीमाशुल्क विभागाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या. संपूर्ण किनारपट्टीवर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या विमानांकडून पाळत ठेवण्यात आली होती. तसेच हेलिकॉप्टर्स देखील ऑफशोअर प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या विशेष मोहिमेला मदतीसाठी तैनात करण्यात आली होती.
* * *
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688499)
Visitor Counter : 337