पंतप्रधान कार्यालय

मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2021 11:30AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

"देशवासियांना मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्यदेव सर्वांच्या आयुष्यात नवी  ऊर्जा आणि नवा  उत्साह घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो."

सर्वाना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

"भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो. हा पवित्र सण भारताची विविधता आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडवतो. आपल्या निसर्गाप्रति आदर व्यक्त करण्याचे महत्व देखील हा सण अधोरेखित करतो " असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1688466) आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam