जलशक्ती मंत्रालय
“स्मार्ट पाणीपुरवठा मोजणी आणि देखरेख प्रणाली” यांच्या विकासासाठी ग्रॅंड चॅलेंज
Posted On:
13 JAN 2021 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
जलशक्ती मंत्रालयाचे, राष्ट्रीय जल जीवन मिशन (एनजेजेएम), पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने जलशक्ती मंत्रालयाने दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी “स्मार्ट पाणीपुरवठा मोजणी आणि देखरेख प्रणाली” यांच्या विकासासाठी आयसीटी ग्रॅंड चॅलेंजला आरंभ केला. जल जीवन मिशन ही ग्रॅंड चॅलेंज याचे उपाययोजन करणारी संस्था असेल आणि सी-डॅक,बंगळुरू, ही या आव्हानाला तांत्रिक सहाय्य करून अंमलबजावणी करणारी संस्था आहे. संपूर्ण भारताने यात उत्साहपूर्ण सहभाग घेतला. एलएलपी कंपन्या, इंडियन टेक स्टार्ट-अप्स,वैयक्तिक अशा विविध क्षेत्रांतून एकूण 218 अर्ज प्राप्त झाले. शिक्षण, उद्योग, जल जीवन मिशन, सी-डॅक, भारताचे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी केंद्र, सेंटर ऑफ एक्सेलन्स, माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालय इत्यादी क्षेत्रातील तज्ञ मंडळीच्या सहभागाने पंचांची स्थापना केली गेली.
पंचांच्या शिफारशींच्या आधारे आयसीटी ग्रँड चॅलेंजचे निकाल 20 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आले. आदर्श 10 अर्जदारांची निवड करण्यात आली असून प्रत्येकाला रु. 7.50 लाख देऊन संकल्पनेच्या टप्प्यापासून प्रारुप विकसित केली जात आहेत.
सध्या अशी प्रारूपे विकसीत केली जात असून पंचांच्याद्वारे जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात विकसित प्रारुपांचे मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनांसाठी सी-डॅक बेंगळुरू इलेक्ट्रॉनिक्स सिटी कॅम्पसमध्ये वॉटर टेस्ट बेड तयार केले आहेत. उत्पादन विकासासाठी, सर्वोत्कृष्ट चार तांत्रिक-आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नमुन्यांची निवड केली जाईल आणि प्रत्येक संघाला युजर एजन्सीच्या गरजेनुसार त्यांचे उत्पादन तयार करण्यासाठी 25 लाख रुपये मिळतील.
त्यानंतर जल जीवन मिशनने निश्चित केल्यानुसार देशभरातील 25 ठिकाणी यांचे साधारणपणे क्षेत्र चाचणी, उपयोजन आणि प्रदर्शन केले जाईल. मूल्यांकनाच्या आधारे, एक विजेता आणि दोन उपविजेते निवडले जातील आणि त्यांना प्रत्येकी 50 लाख (विजेता) आणि 20 लाख (उपविजेते) समर्थन देण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय जल जीवन मिशन यांच्या आर्थिक सहाय्याने हा उपक्रम केला जात आहे.
जल जीवन मिशन हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरांना नळ जोडणी देणे हा आहे. पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट, 2019, रोजी घोषित केलेल्या या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ग्रामीण भागातील 3.13 कोटी घरगुती नळ जोडण्या केल्या आहेत.


Video Link:
https://drive.google.com/file/d/1IQH34SD77MbPvbZAl4VAJcp3HnTLBKge/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1NVBwTdVpS5wGJCR_OTf8A0wNG0_iL7Jn/view?usp=sharing
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688271)
Visitor Counter : 208