पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केले प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे उद्घाटन


कोरोना विरुद्ध लढ्यामध्ये प्रवासी भारतीयांच्या योगदानाचे कौतुक

जागतिक आव्हाने कमी करण्यासाठी मदत करण्यात भारत नेहमीच आघाडीवर

Posted On: 09 JAN 2021 10:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे आज उद्घाटन केले. सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनी आपापल्या देशात कोरोना महामारीच्या काळात निभावलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे या समारंभ प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा ते संबंधित देशांमधील राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करीत असत, तेव्हा सातासमुद्रापार राहणारे भारतीय त्यांच्या देशांमध्ये डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि सामान्य नागरिक म्हणून भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असे. भारताचा कोविड विरोधात असलेल्या लढ्यामध्ये सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनी त्यांचे योगदान दिल्याचाही त्यांनी येथे उल्लेख केला.

वाय टू के संकट आणि भारतीय फार्मा उद्योगाने बजावलेल्या भूमिकेचा त्यांनी येथे उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, माणुसकीला फायदा करून देण्याचीच भारताची भूमिका कायम राहिली आहे. जागतिक आव्हाने कमी करण्यासाठी मदत करण्यात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. वसाहतवादाविरुद्ध आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताच्या पुढाकाराने या संकटांना सामोरे जाण्यासाठी जगाला बळ दिले.

पंतप्रधान म्हणाले की, जगाचा भारतावर, तसेच भारतीय अन्न, फॅशन, कौटुंबिक मूल्ये आणि व्यवसाय मूल्ये यावर जो विश्वास आहे, त्याचे बरेचसे श्रेय हे भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना जाते. भारताबाहेरील भारतीयांच्या आचरणाने भारतीय पद्धती आणि मूल्ये याबद्दल उत्सुकता निर्माण केली आणि या उत्सुकतेचे परिणामी या अधिवेशनात रूपांतर झाले. पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट हाती घेऊन भारत आता वाटचाल करीत आहे, भारतीय उत्पादने वापरून भारतीय उत्पादनांबाबत विश्वास निर्माण करण्याची महत्त्वाची भूमिका परदेशात राहणाऱ्या भारतीयांची आता आहे.

पंतप्रधानांनी प्रवासी भारतीयांबाबत सांगितले की, यात त्यांनी साथीच्या आजाराला भारताने सक्षम प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर या विषाणूच्या विरुद्ध लोकशाही एकजूटतेचे अन्य कोणतेही उदाहरण नाही. पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर, चाचणी किट यासारख्या गंभीर गोष्टींवर अवलंबून असले तरी भारताने केवळ स्वालंबी होण्यासाठीच त्यांची क्षमता विकसित केली नाही, तर बऱ्याच गोष्टींची निर्यातही सुरू केली. आज, सर्वात कमी मृत्यू दर आणि वेगाने रुग्ण बरे होण्याचा दर असलेल्या देशांमध्ये भारत आहे. जगासाठीची फार्मसी म्हणून, भारत जगाला मदत करीत आहे आणि देशात स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या दोन लसी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमास प्रारंभ करण्यास तयार आहे म्हणूनच संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष लागून आहे.

देशभरात झालेल्या महागाईच्या काळात भ्रष्टाचाराला आळा घालून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) केलेल्या कार्याबद्दल जागतिक स्तुतीसाठी आलेल्या प्रचितीचा माहिती पंतप्रधानांनी दिली. त्याचप्रमाणे गरीबांचे सबलीकरण आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रातील प्रगती या देशासाठी गौरवाची बाब आहेत.

पंतप्रधान म्हणाले की आजचा भारताचा अंतराळ कार्यक्रम, तांत्रिक लघुउद्योग परिसंस्था पाहता, त्यांचे वारू हे भारताच्या निरक्षरतेचे जुन्या काळातील चित्र आता बदलवून टाकत आहेत. तसेच त्यांनी भारताबाहेरील भारतीयांना अलिकडच्या काही महिन्यांत शिक्षणापासून ते उपक्रमांपर्यंत केलेल्या सुधारणांचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले. यासंदर्भातले उत्पादन लोकप्रिय करण्यासाठी उत्पादनाशी जोडलेल्या सबसिडी योजनेचा त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला.

पंतप्रधानांनी मातृभूमीकडून सर्वप्रकारच्या सहकार्याचे त्यांना आश्वासन दिले. त्यांनी वंदे भारत मोहिमेचा उल्लेख केला ज्यामध्ये कोरोना काळात 45 लाखाहून अधिक भारतीयांची सुटका करण्यात आली. त्यांनी भारताबाहेरील भारतीयांचे रोजगार टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या मुत्सद्दी प्रयत्नांची माहिती दिली. आखाती देश व इतर भागातून परत आलेल्या परप्रांतीयांसाठी कुशल कामगार आगम डेटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट (स्वदेस SWADES) चा पुढाकार घेणयात आला आहे. प्रवासी भारतीयांशी सुसंवाद आणि संपर्क करण्यासाठी ग्लोबल प्रवासी रिश्ता पोर्टलबाबत देखील त्यांनी चर्चा केली.

पंतप्रधानांनी सुरीनाम प्रजासत्ताकचे माननीय अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांचे त्यांच्या पुढाकाराबद्दल आणि मुख्य भाषणाबद्दल आभार मानले. त्यांना लवकरच भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मोदी यांनी प्रवासी भारतीय सम्मानमधील विजेते आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्थलांतरितांना देखील सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी स्थलांतरित सदस्यांना आणि जगभरातील भारतीय मिशनमधील लोकांना एक पोर्टल, एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यास सांगितले, ज्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रवासी भारतीयांचे योगदान नोंद केलेले असू शकते.

....

R.Tidke/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687381) Visitor Counter : 197