ऊर्जा मंत्रालय

सिंगरौली येथील सर्वात जुन्या राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्राने या आर्थिक वर्षात नोंदविला आत्तापर्यंतचा सर्वाधिक पीएलएफ

Posted On: 08 JAN 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
 

उत्तरप्रदेशातील सिंगरौली येथे 38 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पहिल्या राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्राने एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत 100.24% इतका सर्वाधिक प्लॅट लोड फॅक्टर मिळविला आहे, अशी माहिती केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिली आहे. 200 मेगावॅटने1982 साली सुरू झालेल्या या केंद्राने तयार केलेला हा मजबूत प्लॅट लोड फॅक्टर या केंद्राच्या असाधारण  कार्य आणि देखभाल क्षमतेचा निदर्शकआहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/IMG-20210108-WA00084JEO.jpg

सिंगरोली युनिट क्रमांक #1ने मिळविलेल्या कार्यक्षमतेसह आणि सिंगरौली युनिट क्रमांक #4 आणि छत्तीसगडमधील कोरबा युनिट#1 & #2 यांनी पहिल्या पाच क्रमांकांची केंद्रे म्हणून स्थान मिळवले आहे.

ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक विभाग एनटीपीसीने जारी केलेल्या पत्रकानुसार, एनटीपीसी समूहाने एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत सर्वाधिक 222.4 अब्ज युनिट इतके एकूण उत्पादन केले असून मागील वर्षापेक्षा याच कालावधीत त्यात 3.8%ची वाढ झाली आहे.एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एनटीपीसीने 92.21% इतकी उच्च उपलब्धता कायम राखली असून, गतवर्षी ती  याच कालावधीत 87.64% इतकी होती.

एनटीपीसीची  प्रमुख सहा केंद्रे म्हणजे छत्तीसगडमधील एनटीपीसी कोरबा (2600 MW) आणि एनटीपीसी सिपत (2980 MW) उत्तरप्रदेशातील एनटीपीसी रीहांद (3000 MW), मध्यप्रदेशातील विंध्याचल एनटीपीसी (4760 MW) आणि ओदिशातील ताल्चर थर्मल (460 MW) आणि ताल्चर कानिहा (3000 MW) या प्रमुख विद्युत ऊर्जा केंद्रांनी देशातील पहिल्या दहा कार्यक्षम केंद्रांमध्ये स्थान मिळवले आहे.

एकूण स्थापित क्षमता 62.9 गिगावॅट असलेली एनटीपीसीची एकूण 71 ऊर्जा स्थानके असून त्यापैकी 24 कोळशाची, 7 सायकल वायु/द्रव, 1 जल, 25 सहाय्यक केंद्रांसह 14 अक्षय आणि जेव्ही (एकत्रित) ऊर्जा स्थानके आहेत.या समूहाची 20 गिगावॅटची केंद्रे, निर्माणाधीन असून त्यात 5 गिगावॅटचे अक्षय आणि जल विद्युत प्रकल्प आहेत.

  
* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1687107) Visitor Counter : 179