जलशक्ती मंत्रालय

जल जीवन मिशन अंतर्गत 3.04 कोटी नवीन जोडण्या

100% पाणीपुरवठा नळाद्वारे करणारे गोवा हे पहिले राज्य

Posted On: 07 JAN 2021 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021

केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी केंद्र सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ या महत्वाच्या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.  या योजनेच्या प्रगतीसंदर्भात पेयजल व सांडपाणी व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त सचिव  भारत लाल यांनी सादरीकरण केले.

स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते ऑगस्ट 2019 पर्यंत 3.23 कोटी ग्रामिण घरांमध्ये (एकूण 18.93 कोटी ग्रामिण घरांपैकी) नळाद्वारे पिण्याचे पाणी दिले गेले, पण या योजनेद्वारे एक वर्ष या नाममात्र कालावधीत ग्रामिण भागातील घरांमध्ये 3.04 कोटी नवीन जोडण्या दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती कटारिया यांनी दिली.

100% पाणीपुरवठा नळाद्वारे करणारे पहिले राज्य गोवा  असल्याची माहिती त्यांनी दिली आणि आतापर्यंत 27 जिल्हे, 458 ब्लॉक्स, 33,516 ग्रामपंचायती व 66,210 गावांनी ‘हर घर जल’  साकार केल्याचे त्यांनी नमूद केले.

या गावातील नागरिक, ग्रामपंचायती, पाणीसमित्या, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व इतर संबधितांना त्यांनी या यशाचे श्रेय दिले.

तेलंगणा, गुजरात, हरयाणा ही राज्ये व पॉंडेचरी हा केंद्रशासित प्रदेश 100% चे उद्दीष्ट गाठण्याच्या जवळपास आली आहेत.

जलजीवन मिशन ही गावातील पाणी तसेच सांडपाणी व्यवस्थापन समित्या/पाणी समित्यांमध्ये गावातील महिलांचा अधिकारिक समावेश आणि सर्व नियोजन तसेच ग्राम कृती योजना(VAPs) यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग यांची पुष्टी करणारी योजना आहे. या अंतर्गत  प्रत्येक  गावातील  5 महिलांना फिल्ड परिक्षण संच (FTKs), वापरून पाण्याचा दर्जा तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते, जेणेकरून या जोडणीद्वारे योग्य दर्जाचा पेयजल पुरवठा होण्याची खातरजमा होते.

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1686884) Visitor Counter : 11