शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते ‘एड्युकॉन -2020’ या दोन दिवसीय आभासी आंतरराष्ट्रीय अखंड परिषदेचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2021 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज दोन दिवसीय आभासी आंतरराष्ट्रीय अखंड परिषद ‘एज्युकॉन 2020’ चे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. सीयूपीबी चे कुलगुरू प्रा. (डॉ.) राघवेंद्र पी. तिवारी, आणि पद्मश्री डॉ. महेंद्रसोधा (जीईआरए) यांच्या मदतीने आणि ग्लोबल एज्युकेशनल रिसर्च असोसिएशन (जीईआरए) च्या सहकार्याने केंद्रीय विद्यापीठ पंजाब , भटिंडा (सीयूपीबी) यांनी ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. जागतिक शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी युवकांच्या परिवर्तनासाठी शिक्षण कल्पना ही एड्युकॉन 2020 ची मुख्य संकल्पना आहे.
परिषदेसाठी योग्य आणि प्रासंगिक संकल्पना निवडल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सीयूपीबीचे कौतुक केले. संशोधन हा 24 तास चालणारा सराव असून त्यासाठी कठोर चिकाटी आवश्यक आहे असा संदेश ही दोन दिवसीय अखंड परिषद जगभरातील संशोधक आणि विद्यार्थ्यांना देईल असे ते म्हणाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे भावी शिक्षकांना शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि त्यांची कार्यप्रणालीची ओळख करून घेण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते आणि युवा संशोधकांनी एज्युकॉन 2020 दरम्यान केलेल्या चर्चेमुळे एनईपी -2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक पथदर्शक आराखडा तयार करण्यात आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये तरुणांना योगदान देता यावे यासाठी त्यांच्यात आवश्यक कौशल्य विकसित करण्यात हे निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये मातृभाषेला चालना , माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण आणि इतर नाविन्यपूर्ण सुधारणा या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हे धोरण सर्व स्तरासाठी क्रांतिकारक असल्याचे रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हे धोरण अध्यापन-शिक्षण प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचा विस्तारित वापर, ऑनलाइन पाठ्यक्रमातील अभ्यास सामुग्रीचा विकास, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सची ओळख आणि राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (एनआरएफ) आणि राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच यांच्या स्थापनेच्या या उद्देशाने आराखडा तयार करण्याची गरज आहे. ज्यामुळे भारतीय अभ्यासकांना जागतिक स्तरावरील स्पर्धेत याचा फायदा होईल. समाजात बदल घडवून आणण्यासाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी समाज आणि युवकांचे जीवन परिवर्तन करण्यासाठी आवश्यक एनईपी- 2020 च्या सर्व नवीन बाबी यशस्वीरित्या राबवण्यासाठी त्यांनी ‘परफॉर्म, रिफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म’ हा मंत्र दिला.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत ब्रिटन, कॅनडा, थायलंड, अमेरिका , ऑस्ट्रेलिया, भूतान आणि भारतातील अभ्यासक ‘जागतिक शांतता स्थापित करण्यासाठी युवकांच्या परिवर्तनासाठी शिक्षण व्यवस्था’ या मुख्य संकल्पनेच्या दहा उपसंकल्पनांवर 31 तास अखंड चर्चा करतील. भारतात अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आयोजित केली आहे जिथे भारतात योग्य दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च शिक्षणात आयसीटीच्या वापराच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी जगभरातील विद्वान 31 तास अखंड चर्चा करणार आहेत.
S.Kane/S.Mhatre/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1686871)
आगंतुक पटल : 274