संरक्षण मंत्रालय
सरकार आमच्या सैनिकांसाठी सर्वोत्तम शस्त्रे आणि संरक्षणात्मक चिलखत पुरविण्याची तजवीज करेल: संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांचे प्रतिपादन
Posted On:
06 JAN 2021 8:09PM by PIB Mumbai
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी 6 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांच्याकडे एक लाखावे बुलेट प्रूफ जॅकेट (बीपीजे) सुपूर्द केले.
शत्रूविरूद्ध लढणार्या आपल्या सैनिकांच्या अनमोल जीवनाचे संरक्षण करण्याची आपली वचनबद्धता सरकारने पूर्ण केली आहे असे संरक्षण राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने आमच्या सैनिकांच्या कर्तव्य बजावताना घ्यायच्या सुरक्षिततेवर जास्त भर दिला आहे. "आमच्या सैनिकांना उत्तम शस्त्रे आणि संरक्षक चिलखत प्रदान करण्याबाबत सरकार सुनिश्चित करेल आणि अशा आवश्यकता नेहमीच प्राधान्यक्रमात सर्वोच्च राहतील असे श्रीपाद येसो नाईक यांनी सांगितले." नियोजित मुदतीपूर्वी चार महिने पहिली एक लाख जॅकेट पुरवल्याबद्दल त्यांनी मेसर्स एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेड निर्मात्यांचे कौतुक केले. संरक्षण राज्यमंत्री म्हणाले की, ज्या बुलेटप्रूफ जॅकेटचा पुरवठा केला जात आहे ते मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी उत्पादन आहे आणि कंपनी जगभर हे उत्पादन निर्यात करून सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने संरक्षण पुरवठा करण्याचे जागतिक केंद्र बनवित आहे.
ते म्हणाले की या जॅकेटचे आमच्या सैनिकांनी कौतुक केले आहे जे ते सीमेवर वापरत आहेत आणि बंडखोरीचा प्रतिकार करीत आहेत.
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686634)
Visitor Counter : 264