पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

यमुना नदीतील अमोनिआकल नायट्रोजनवर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त अभ्यासगटाची आणि देखरेख पथकाची स्थापना

Posted On: 05 JAN 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2021

 
यमुना नदीतील अमोनिआकल नायट्रोजनचे प्रमाण वाढण्याच्या वारंवार उदभवणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तसेच त्यासाठीच्या लघु आणि दीर्घकालीन उपाययोजनावर विचारविनिमय करण्यासाठी सीपीसीबी म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 4 जानेवारी रोजी एक बैठक घेतली. या बैठकीसाठी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती, हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली जल मंडळ, हरयाणाचे सिंचन आणि जलस्रोत खाते आणि दिल्लीचे सिंचन आणि पूरनियंत्रण खाते- या विभागांच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. 

प्रदीर्घ चर्चा आणि विचारविनिमयानंतर या समस्येच्या मूळ कारणांवर यावेळी एकमत झाले. नदीच्या प्रवाहाच्या वरच्या भागात हरयाणातील शहरांनी प्रक्रिया न करताच सांडपाणी विसर्जित करणे, कारखान्यांतील दूषित पाण्याचा विसर्ग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच मैलाप्रकिया प्रकल्प, दिल्लीच्या बाह्यभागातील मलनिस्सारण व्यवस्था नसलेल्या वसाहतींतून टँकर्सद्वारे वगैरे बेकायदेशीरपणे यमुनेत सोडले जाणारे सांडपाणी तसेच नदीतळावर साठलेला गाळ सडण्याची प्रक्रिया- अशा कारणांनी यमुनेच्या पाण्यातील त्या घटकाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले आहे.

यावर उपाय शोधण्यासाठी दिल्ली जल मंडळ, हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती, हरयाणाचे सिंचन आणि जलस्रोत खाते आणि दिल्लीचे सिंचन आणि पुअर नियंत्रण खाते या सर्वांचा मिळून एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. हा गट देखरेख आणि निरीक्षणासाठीच्या एकसमान प्रोटोकॉलचे परीक्षण करेल, तसेच देखरेख प्रणाली बळकट करण्याच्या गरजेवर विचार करेल. पूर्वी संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण, प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण, तसेच अमोनिया पातळी उच्च असण्याचा काळ आणि त्याचे हॉटस्पॉट यांचा शोध हा गट घेईल. शाश्वत संतुलित उपाय आणि लघु तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्याचे कामही या गटाला करावयाचे आहे. तसा अहवाल दाखल करण्यासाठी या गटाला एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686340) Visitor Counter : 191