शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्री आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांनी संयुक्तरित्या केले टॉयकॅथॉन - 2021 आणि टॉयकॅथॉन पोर्टलचे उद्घाटन
टॉयकॅथॉनचे लक्ष्य आहे टॅप इंडियाच्या एक अब्ज डॉलर्सचे टॉय मार्केट
Posted On:
05 JAN 2021 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज संयुक्तपणे टॉयकॅथॉन - 2021 चे उदघाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी संयुक्तपणे टॉयकॅथॉन पोर्टलचे लोकार्पण देखील केले. भारतीय मुलभूत प्रणालीवर आधारित नाविन्यपूर्ण खेळण्यांची संकल्पना हे या टॉयकॅथॉनचे उद्दीष्ट असून ते मुलांमध्ये सकारात्मक वर्तन आणि चांगल्या मूल्यांची रुजवण करेल.
भारताला, जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी टॉयकॅथॉन आयोजित केले जात आहे. भारतातील खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे परंतु दुर्दैवाने 80% खेळणी आयात केली जातात. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा धांडोळा घेऊन त्यांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी वातावरण तयार करण्याचा टॉयकॅथॉन सुरु करण्यामागचा सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती यावेळी पोखरियाल यांनी दिली.
भारत 80 टक्के खेळणी आयात करतो आणि देशाला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवून स्वदेशी खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांनी नमूद केले. शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने देशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आत्मनिर्भर भारताच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे त्यांनी सांगितले.
टॉयकॅथॉन - 2021 विषयी
हे एक खास प्रकारचे हॅकेथॉन आहे जिथे शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी आणि शिक्षक, डिझाइन तज्ञ, खेळणी तज्ञ आणि स्टार्टअप्स, भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्य, स्थानिक लोककथा आणि थोर व्यक्ती यावर आधारित खेळणी आणि खेळ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करतील.
टॉयकॅथॉन 2021 मधील सहभागासाठी कृपया https://toycathon.mic.gov.in वर भेट द्या. यासंबंधीचे प्रस्ताव 5 जानेवारी ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन सादर करता येतील.
टॉयकॅथॉन -2021 ची पीपीटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Tupe/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686304)
Visitor Counter : 247