केंद्रीय लोकसेवा आयोग
नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल- राखीव यादी
Posted On:
04 JAN 2021 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021
भारतीय प्रशासन सेवा, परदेश सेवा, पोलीस दल आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मधील 927 जागा भरण्यासाठी 829 उमेदवारांची शिफारस करणारा नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 चा निकाल 4 ऑगस्ट 2020 ला प्रसिध्द केलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला होता.
नागरी सेवा परीक्षा नियम 16 (4) आणि (5) ला अनुसरून आयोगाने संदर्भित श्रेणीतील शिफारस झालेल्या शेवटच्या उमेदवारापेक्षा कमी गुण मिळविलेल्या उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देखील तयार केली होती.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या मागणीनुसार, आयोगाने त्यातील 89 उमेदवारांची शिफारस यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वसामान्य श्रेणीतील 73, इतर मागासवर्गीय श्रेणीतील 14, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील 01आणि अनुसूचित जातीतील एका उमेदवाराचा समावेश आहे. या उमेदवारांचे तपशील सोबत जोडले आहेत. शिफारस झालेल्या या उमेदवारांना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागातर्फे प्रत्यक्ष सूचित केले जाईल.
अनुक्रमांक 0404736, 0835241, 2100323 आणि 6603686 यांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरुपाची आहे.
एका उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
या सर्व 89 उमेदवारांची यादी केंद्रीय नागरी सेवा आयोगाच्या http//www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अनुक्रमांक :- यादीसाठी येथे क्लिक करा
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686107)