रेल्वे मंत्रालय
पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या नुकत्याच उद्घाटन केलेल्या न्यू खुर्जा-न्यू भाऊपूर टप्प्यावर मालवाहू रेल्वेनी गाठला परिवर्तन घडवणारा ताशी 90 किलोमीटरपेक्षा जास्त वेग
Posted On:
04 JAN 2021 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021
पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या नुकत्याच उद्घाटन केलेल्या न्यू खुर्जा-न्यू भाऊपूर टप्प्यावर मालवाहू रेल्वेनी ताशी 90 किलोमीटरपेक्षा जास्त हा सर्वाधिक वेग गाठायला सुरवात केली असून यामुळे मोठे परिवर्तन घडण्यासाठी मदत होणार आहे. या रेल्वेच्या जलद गतीमुळे मालाची वेगवान वाहतूक आणि माल वाहतूक खर्च कमी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29.12.2020 ला पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या न्यू खुर्जा-न्यू भाऊपूर या 351 किलोमीटर लांबीच्या, टप्प्याचे उद्घाटन केले आहे. या मार्गिकेच्या उद्दिष्टांची पूर्तता करत या नुकत्याच उद्घाटन झालेल्या टप्प्यावर महत्वाच्या वस्तूंची अखंड वाहतूक सुरु आहे. 3 जानेवारी 2021 पर्यंत या नव्या टप्प्यावर 53 मालवाहू रेल्वे धावल्या आहेत.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1686040)
Visitor Counter : 230