गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांच्या हस्ते ‘नॅशनल पोलीस के-नाईन जर्नल’च्या उद्घाटनपर अंकाचे प्रकाशन


‘समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस श्वानपथक पोलिस दलाची बलक्षमता वाढवणारा महत्वाचा घटक’ : अमित शाह

Posted On: 02 JAN 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय पोलीस के-नाईन जर्नल’ चे प्रकाशन झाले. पोलीस सेवेत असलेल्या श्वानपथकांची माहिती देणारे हे असे पहिलेच प्रकाशन आहे.

“हा एक अनोखा उपक्रम असून, पोलीस सेवेत असलेल्या देशभरातील श्वान पथकांशी सबंधित विषय अधिक समृद्ध होऊ शकतील. राष्ट्रीय सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षेशी सबंधित सर्व घटकांकडे समान लक्ष देण्यासाठी सरकार अत्यंत गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे  प्रयत्नरत आहे. समाज सुरक्षित राखण्यासाठी पोलीस श्वानपथक या दलाचे बळ कित्येक पटीने वाढवणारा घटक सिध्द होऊ शकतो, ड्रोन आणि उपग्रहांप्रमाणेच या पथकांचाही वापर करता येईल. अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाशी लढा देतांना श्वानपथकांचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो,”  असे अमित शाह यावेळी म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पोलीस आधुनिकीकरण विभागाअंतर्गत, पोलीस सेवेत के-नाईन (श्वानपथक) ला चालना देणे आणि या पथकाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत.  नोव्हेंबर 2019 मध्ये ‘पोलीस के-नाईन सेल’ची स्थापना करण्यात आली होती. पोलीस के-नाईन पुस्तिकेचे प्रकाशन ही देशात श्वानपथकांना प्रशिक्षण देणे आणि एक उत्तम सुरक्षा स्त्रोत म्हणून त्यांचा उपयोग करण्याविषयी जागृती करण्यासाठीचे एक महत्वाचे पाऊल आहे. ही पुस्तिका वर्षातून दोनदा- एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात प्रकाशीत केली जाईल.

* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685690) Visitor Counter : 166