सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

ई-कॉमर्स मंच ई-विपणनाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या प्रक्रिया पुनर्रचनेचे आणखी एक प्रतीक बनले आहे

Posted On: 01 JAN 2021 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021

 

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) खादी इंडियाची अधिकृत ई-कॉमर्स साइट eKhadiIndia.com चा प्रारंभ केला. या संकेतस्थळावर स्थानिक  खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनांचे 500 हून अधिक प्रकारांतर्गत 50,000 पेक्षा जास्त उत्पादने  उपलब्ध आहेत. हे पोर्टल एमएसएमईला पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे

पोर्टलच्या चाचणी  दरम्यान, एमएसएमई सचिव, ए.के. शर्मा यांनी नमूद केले की आपले विणकर, कारागीर आणि शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच आपले प्राधान्य  असते. त्याचबरोबर त्यांनी बनविलेल्या पर्यावरण-स्नेही आणि अस्सल खादी आणि पारंपारिक ग्रामोद्योग उत्पादनांनी नेहमीच भारतीय लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.  आता, ती उत्पादने फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत. पोर्टल ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल आणि त्यांना घरपोच उत्पादने पुरवेल. गेल्या काही महिन्यांपासून, आम्ही कोविडच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्यासाठी सर्व मर्यादा दूर करत आहोत. केव्हीआयसीचे ईकॉमर्स पोर्टल त्या दिशेने आम्ही सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685456) Visitor Counter : 287