भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोगाकडून टीपीजी  ग्रोथ व्ही एस एफ मार्केट प्रायवेट लिमिटेडकडून एपीआय  होल्डिंग प्रायवेट मर्यादित च्या 8% भागभांडवलाच्या अधिग्रहणास मंजूरी

Posted On: 31 DEC 2020 1:56PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने काल टीपीजी ग्रोथ व्ही एस एफ मार्केट प्रायवेट लिमिटेड  (TPG/Acquirer) कडून एपीआय  होल्डिंग प्रायवेट मर्यादित (API/Target)च्या 8% भागभांडवलाच्या अधिग्रहणास स्पर्धा कायदा, 2002 च्या  कलम 31(1) नुसार मंजूरी दिली आहे.

अधिग्रहण करणारी कंपनी ही सिंगापूरमधील विशेष उद्दिष्टाने  स्थापन झालेली नवी  कंपनी आहे आणि सध्या तिची भारतात एकही गुंतवणूक वा प्रत्यक्ष अस्तित्व नाही. या अधिग्रहणकर्ती असलेल्या कंपनीला TPG (. TPG ग्लोबल, LLC व सहयोगी) व कोरियन इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन संयुकतपणे निधीपुरवठा करतील.

API होल्डिंग ही भारतातील कंपनी असून ती API होल्डिंग ग्रुपची मूळ घटक कंपनी आहे. API होल्डिंग थेट वा सहाय्यक कंपन्यांच्या मदतीने पुढील व्यवसायिक कामे करू शकते.

  • औषधांची विक्री व वितरण ( यामध्ये औषधी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे व थेट दिली जाणारी औषधे)
  • वाहतूक सेवेला परवानगी विशेषतः औषधक्षेत्राशी संबधित वाहतूक.
  • उत्पादने, वैद्यकीय उपकरणे व थेट दिली जाणारी औषधे  यांची ई-कॉमर्स मंचावरून विक्री करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा मालकी हक्क व बौध्दिक संपदेवरील हक्क प्रस्थापित करणे
  • औषधी, आयुर्वेदिक, पोषण उत्पादने, निर्जंतुकीकरण करणारी उत्पादने, जीवनावश्यक औषधे, हर्बल उत्पादने व फूट सप्लीमेंट यांचे उत्पादन (कंत्राट पद्धतीने) व विपणन

 

याबाबतीतील भारतीय स्पर्धा आयोगाचा सविस्तर आदेश जारी होईल.

****

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685038) Visitor Counter : 101