संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्करामध्ये पूल निर्माणासाठी स्वदेशी कार्यप्रणालीचा समावेश

Posted On: 30 DEC 2020 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2020

 

आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी संरक्षण क्षेत्रात सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नातून डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने खाजगी उद्योगाच्या सहकार्याने पूल निर्माणासाठी स्वदेशी कार्यप्रणालीचा समावेश केला आहे. लष्कराच्यावतीने तळेगाव येथे लार्सन अँड टुब्रो कारखान्यामध्ये 10 मीटर लांबीच्या लहान पूलाचे तीन संच तयार करण्यात आले आहेत. हे पूल 29 डिसेंबर, 2020 रोजी औपचारिकरित्या लष्करी अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आले.

लष्करी कारवाईच्या काळामध्ये आपल्या सैन्याला अनेक प्रकारची सामुग्री एका स्थानावरून दुसरीकडे पाठवावी लागते, अशा वेळी दुर्गम भागामध्ये सैन्याला गतिशीलता प्रदान करण्यासाठी असे पूल अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.

या पूलाची संरचना आणि निर्मिती स्वदेशी साहित्य वापरून करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या संरक्षणविषयक गरजा लक्षात घेऊन आत्मनिर्भरता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पूल विकसित करण्यात आला आहे. या कामाच्या पूर्ततेमध्ये आलेल्या आव्हानांना मात करून सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला आहे.


* * *

S.Tupe/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684808) Visitor Counter : 141