अर्थ मंत्रालय
आयएफएससीएने बँकिंग युनिट्सना भागीदारी कराराद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्यास अनुमती दिली
Posted On:
30 DEC 2020 1:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने (आयएफएससीए) आज बँकिंग युनिट्सना (बीयू) इतर वित्तीय संस्था, भारतात राहणा-या व्यक्ती आणि भारताबाहेर राहणा-या व्यक्तींना/कडून इतर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रमाणित जोखीम भागीदारी कराराद्वारे मालमत्ता हस्तांतरित करण्यास अनुमती दिली.
जोखीम भागीदारी कराराच्या माध्यमातून मालमत्ता हस्तांतरण ही अनेक अधिकार क्षेत्रात विशेषत: व्यापार वित्त क्षेत्रामध्ये सामान्य गोष्ट आहे. अशी जोखीम भागीदारी ही दोन संस्थांमधील जोखीम भागीदारी करार (खरेदी व विक्री युनिट) या प्रमाणित दस्तऐवजाच्या अंतर्गत द्विपक्षीय कराराच्या स्वरूपात केली जाते. बँकर्स असोसिएशन फॉर फायनान्स अँड ट्रेड (बीएएफटी) ने विकसित केलेला मास्टर रिस्क पार्टिसिपेशन करार (एमआरपीए) म्हणजे सामान्य जोखीम सहभागाच्या करारांपैकी एक आहे.
वरील वितरणामुळे विदेशी न्यायकक्षेतील बँकांऐवजी बीयूमार्फत आयएफएससीमध्ये परकीय चलन मालमत्तेच्या जोखीम सहभागास प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे.
* * *
U.Ujgare/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684592)
Visitor Counter : 151